पालघर साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीने दाखल केली दोन आरोपपत्रे, केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 09:04 AM2020-07-16T09:04:16+5:302020-07-16T09:28:35+5:30
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीने १२६ आरोपींविरुद्ध सुमारे ११ हजार पानांची दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. यातील एक आरोपपत्र ५ हजार तर दुसरे आरोपपत्र ६ हजार पानांचे आहे.
मुंबई/पालघर - कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पालघर येथे दोन साधूंसह तीन जणांची बेदम मारहाण करून ह्त्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडावरून राजकारणही मोठ्या प्रमाणात पेटले होते. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीने १२६ आरोपींविरुद्ध सुमारे ११ हजार पानांची दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. यातील एक आरोपपत्र ५ हजार तर दुसरे आरोपपत्र ६ हजार पानांचे आहे.
आरोपत्रात ठपका ठेवण्यात आलेल्या १२६ आरोपींसोबत दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. मात्र हे आरोपपत्र प्राथमिक असून, प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पालघरमधील हत्याकांड हे धार्मिक कारणांमुळे झाले नसल्याचा आरोपपत्रात उल्लेख असल्याचे वृत्त काही खाजगी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
दरम्यान, डहाणू सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी १६ एप्रिल रोजी दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाच्या केलेल्या हत्येप्रकरणी २५ आरोपींनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व आरोपींना तांत्रिक मुद्द्यावर जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र डहाणू सत्र न्यालायलाने ते फेटाळून लावला, असे विशेष सरकारी वकील सतीश माने शिंदे यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…
'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...