अजब चोराची गजब गोष्ट! चोरीआधी गोदामाच्या शटरला नमस्कार; चोरी पाहून मालक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 21:08 IST2021-09-14T21:07:44+5:302021-09-14T21:08:54+5:30
चोरट्यानं ४० लाखांच्या सिगारेट लांबवल्या; चोरी पाहून मालक हैराण

अजब चोराची गजब गोष्ट! चोरीआधी गोदामाच्या शटरला नमस्कार; चोरी पाहून मालक हैराण
अजमेर: दुकानं सुरू करताना, शटर उघडताना अनेक दुकानदार देवाचं स्मरण करतात. आजचा दिवस चांगला जाऊ दे, भरभराट होऊ दे अशी प्रार्थना दुकानदार परमेश्वराकडे करतात. तशीच काहीशी कृती राजस्थानात एका चोरानं केली आहे. दुकानात शिरण्याआधी चोरट्यानं शटरला नमस्कार केला. त्यानंतर त्यानं आत जाऊन केलेला कारनामा सीसीटीव्हीत पाहून मालकानं डोक्यावर हात मारला.
राजस्थानच्या अजमेरमध्ये शनिवारी रात्री एका गोदामात चोरी झाली. चोरानं शटर उघडताना नमस्कार केला आणि मग चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. चोरानं जवळपास ४० लाख रुपयांच्या सिगारेट्स घेऊन पोबारा केला. अजमेरमधल्या अलवर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्री नगर रोड परिसरात ही चोरी झाली.
पाकिस्तानचा मोठा कट उधळला! शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई
शनिवारी रात्री एक तरुण एका मुलासह गोदामात शिरली. तरुणानं लोखंडी रॉडच्या मदतीनं कुलूप तोडून गोदामात प्रवेश केला. त्यानं सुरुवातीला गोदामाचं काऊंटर तपासलं. गल्ला पाहिला. मात्र त्याच्या हाती फार काही लागलं नाही. त्यानंतर त्यानं सिगारेटच्या कार्टन तपासून पाहायला सुरुवात केली. कार्टनवरील किंमत पाहून चोरट्यानं ते कारमध्ये ठेवले. सर्वात महागड्या सिगारेटचे कार्टनच चोरानं लांबवले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.