सुशांतसाठी तयार केली होती गांजा असलेली सिगारेट, कुक नीरजने दिला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:30 AM2020-08-24T00:30:47+5:302020-08-24T00:57:35+5:30
या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते.
मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआयने तपास सुरू केला आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूतकडे आचारी असलेल्या नीरजने चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांकडे दिलेला धक्कादायक जबाब समोर आला आहे. सुशांतला गांजाचे व्यसन होते. तसेच मृत्यूच्या आधीच्या दिवशी मी त्याच्यासाठी गांजाच्या सिगारेट तयार करून ठेवल्या होत्या. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर तपासले असता सिगारेटचा बॉक्स रिकामी असल्याचा दावा नीरजने आपल्या जबाबात केला आहे.
या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते. तिथे मी साफसफाई, कुत्र्यांना फिरवून आणणे, चहापाणी पाहणे ही कामे करायचो, असे सांगितले.
दरम्यान, सुशांतचे जुने घर झपाटलेले होते, असा दावाही त्याने केलाय. त्यामुळे डिसेंबर २०१९ मध्ये सुशांत दुसऱ्या घरात शिफ्ट झाला. असेही त्याने सांगितले. केप्री हाऊस अपार्टमेंटमध्ये भूतबाधा होती. तिथे आम्हाला वॉकीटॉकी सेट्स देण्यात आले होते. त्यावरून सुशांत सर आम्हाला काम सांगायचे. मात्र एके रात्री मी झोपलो असताना नीरज लाइट बंद कर असा आवाज वॉकी टॉकीवर ऐकू आला. त्यानंतर मी सुशांत सरांच्या खोलीत जाऊन पाहीलं तर लाइट बंद होती आणि सर झोपलेले होते, असाही दावा त्याने केला.
मुंबई पोलिसांमुळेच घाईघाईत केलं सुशांतचं पोस्टमार्टम... ! अखेर डॉक्टरांनी दिली कबुली
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आता एक नवा खुलासा झाला आहे. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काही त्रूटी आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतचे पोस्टमार्टम करणाºया डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यास सांगितल्यामुळे हा रिपोर्ट देण्यात घाई झाली, अशी कबुली पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांनी दिली आहे.
‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर सीबीआयच्या टीमने काही प्रश्न उपस्थित केले. सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यात इतकी घाई का केली? असा प्रश्न सीबीआय टीमने पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांच्या टीमला केला. यावर डॉक्टरांच्या टीमने थेटपणे मुंबई पोलिसांचे नाव घेतले. मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर रिपोर्ट देण्याचे म्हटले होते. मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरूनच आम्ही रात्री उशीरा सुशांतचे पोस्टमार्टम केल्याचे डॉक्टरांनी सीबीआयला सांगितले.
या रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर 33 सेंमी लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्क म्हणजे, खोल खूण. सुशांतची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती