लिफ्टच्या बहाण्याने लुटमार करणा-या दरोडेखोरांना सिनेस्टाईल अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:47 PM2019-03-29T19:47:24+5:302019-03-29T19:48:03+5:30
भोर-महाड रोडवर आंबेघर गावाजवळ रस्त्यात महिलेला थांबवून लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या अट्टल टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करत चार अट्टल दरोडे खोरांना भोर पोसांनी अटक केली.
भोर : भोर-महाड रोडवर आंबेघर गावाजवळ रस्त्यात महिलेला थांबवून लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या अट्टल टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करत चार अट्टल दरोडे खोरांना भोर पोलिसांनीअटक केली. या गुन्हात एका महिलेसह तीन तरुण असुन एक जण फरार झाला. आरोपींनकडुन एक कार, एक मोटर सायकल यांच्यासह दोन कोयते, एअर गन, मिरची पावडर, पाच मोबाईल असा एकुण १ लाख ९१ हजाराचा एैवज जप्त केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता घडली.
अक्षय महेंद्र यादव (वय १९ रा आंबेघर ता.भोर), विक्रम विजय शिंदे (वय १९, पिंपळेगुरव पुणे, संदीप आनंदा हिरगुडे (वय ३१ रा हर्णस ता.भोर), दिपीका आनंद शिळीमकर (वय २४, रा मोहननगर धनकवडी पुणे) यांना अटक करण्यात आली असून पाचवा आरोपी फरार झाला आहे. त्याचे नाव कळू शकले नाही. आरोपींकडून एक दुचाकी आणि एम मोटार कार पोलिसांनी जप्त केली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पाचवा फरार असलेला आरोपी अक्षय यादवला शोधण्यासाठी जात होता. पहाटे ५ वाजता आंबेघर येथील निरानदीजवळ लाल रंगाच्या कारमध्ये एक महिला व एक जण होते तर एक जण मोटर सायकलवर बसला होता. हे सर्वजण संशयस्पद वाटल्याने पोलिसांनी कार थांबवून त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे दोन कोयते, १ गावठी कट्यासारखी दिसणारी एअर गन, लाल मिरची पावडर, पाच मोबाईल असा एकुण १ लाख ९१ हजाराचा माल पोलीसांनी जप्त केला. यावेळी एक आरोपी फरार झाला. या कारवाईत २१ मार्चला महाड भोर रोडवर गाडी अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन लुटमार करणारा आणि फरार असलेला आरोपी अक्षय महेंद्र यादव सापडला आहे. एक महिला व इतर पाचजण महाडरोडवर महिलेला उभे करुन लिफट मागण्याच्या बहाण्याने गाड्या आडवुन त्यांना लुटण्याच्या तयारीत होते. मात्र, भोर पोलीसांच्या सर्तकतेमुळे गुन्हा होण्याआधीच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीने अशाच प्रकारे लहान मोठे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार प्रदीप नांदे, आप्पा हेगडे, अमोल शेडगे, प्राजक्ता जगताप, अनिल हिप्परकर, दत्तात्रय खेंगरे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे करीत आहेत.
......................
याब टोळीत एक महिला असुन महिलेला रस्त्यावर लिफट देण्याच्या बाहण्याने गाडी थांबवुन त्यानंतर झाडीत लपलेल्या इतर आरोपींनी कोयता पिस्तुलाचा धाक दाखवुन मिरची पावडर डोळयात टाकुन वाहन चालकासाह गाडीतील प्रवाशांना ही टोळी लुटत होती. ही सराईत गुन्हेगारांची टोळीच होती. यातील एक आरोपी सागर यादव पोलीस रेकॉर्डवरचा गुन्हेगार असुन त्याला दरोडा टाकताना पकडुन त्याची रवानगी येरावडयाला केली आहे.
.................
जिल्हा अधिक्षकांनी दिले भोर पोलिसांना २५ हजार रूपये बक्षीस
भोर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अट्टल चोरांना अटक केली. भोर पोलिसांच्या या धाडसी कामगीरीचे कौतूक पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी केले असून या बद्दल २५ हजारांचे बक्षिसही पोलिसांना दिले आहेत.