माती वाहतूक करणाऱ्याकडून दीड लाखांची लाच घेताना सर्कल व तलाठ्यास अटक 

By संजय पाटील | Published: October 13, 2022 04:10 PM2022-10-13T16:10:11+5:302022-10-13T16:10:26+5:30

तडजोडीत दीड लाख देण्याचे ठरले. ही रक्कम घेताना तलाठी गणेश महाजन यास पकडण्यात आले. 

Circle and Talatha arrested for taking bribe of 1.5 lakhs from soil transporter | माती वाहतूक करणाऱ्याकडून दीड लाखांची लाच घेताना सर्कल व तलाठ्यास अटक 

माती वाहतूक करणाऱ्याकडून दीड लाखांची लाच घेताना सर्कल व तलाठ्यास अटक 

googlenewsNext

अमळनेर जि. जळगाव :   जप्त करण्यात आलेले डंपर सोडण्यासाठी सुमारे दीड लाख रुपयांची लाच घेणारा मंडळ अधिकारी आणि  अमळनेर शहर तलाठी यांना अटक करण्यात आली. तलाठी कार्यालयातच गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 

अमळनेर येथील सर्कल दिनेश आनंद सोनवणे (४८, रा.  रा.फरशी रोड, अमळनेर) आणि   शहर तलाठी गणेश राजाराम महाजन (४६, रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) अशी या लाचखोरांची नावे ओहत.  मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा अमळनेरला बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. माती वाहतूक करतांना त्यांच्या मालकीचे डंपर दोन महिन्यापूर्वी  तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. ते  डंपर सोडण्याच्या मोबदल्यात  दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली.  यानंतर तडजोडीत दीड लाख देण्याचे ठरले. ही रक्कम घेताना तलाठी गणेश महाजन यास पकडण्यात आले. 

डीवायएपसी शशिकांत एस.पाटील,  निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोहेकॉ. अशोक अहीरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Circle and Talatha arrested for taking bribe of 1.5 lakhs from soil transporter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.