५५ सेकंदचा थरार! आत्महत्येसाठी मुलीनं मेट्रो स्टेशनवरून उडी मारली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:19 PM2022-04-14T22:19:41+5:302022-04-14T22:49:44+5:30
सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा पंजाबमधील २५ वर्षीय दिव्या मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढली आणि तिथून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती
दिल्ली - गुरुवारी दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर जी घटना घडली ती पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. एका मुलीने मेट्रो स्टेशनच्या भिंतीवरून उडी मारली. मात्र, सीआयएसएफ आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत मुलीचे प्राण वाचवले ही दिलासादायक बाब आहे. हा व्हिडिओ CISF च्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ही २५ वर्षीय तरुणी मेट्रो स्टेशनवरून खाली उडी मारताना दिसत आहे.
सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा पंजाबमधील २५ वर्षीय दिव्या मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढली आणि तिथून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर सीआयएसएफ जवानांची नजर त्या मुलीवर गेली. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सीआयएसएफचे क्यूआरटी कर्मचारी मुलीला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि तिला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण मुलीवर काहीही परिणाम होत नाही.
CISF च्या जवानांनी प्रसंगावधान राखलं
ही घटना घडताना सीआयएसएफचे जवान आणि आजूबाजूला पाहणाऱ्या लोकांची गर्दी जमली. ५५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट पाहू शकता की, जवान खाली ब्लँकेट घालून उभे असल्याचे दिसत आहे. मुलीने वरून खाली उडी मारताच जवानांनी तिला खाली झेलले आणि तिचा जीव वाचला. वरून खाली पडल्यानंतर मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी पंजाबची रहिवासी असून गुरुग्राममध्ये काम करते. बुधवारी संध्याकाळी ही मुलगी पंजाबमधील गुरुदासपूर येथून दिल्लीत आली होती आणि सकाळी तिने हे पाऊल उचलले. तसेच मुलगी मूकबधिर असून तिचे पालकही मूकबधिर आहेत. याच कारणामुळे आत्महत्या का करत आहे त्याची माहिती मिळाली नाही. पोलीस मुलीच्या कुटुंबीयांच्या येण्याची वाट पाहत आहेत.
Saving Lives...
— CISF (@CISFHQrs) April 14, 2022
Prompt and prudent response by CISF personnel saved life of a girl who jumped from Akshardham Metro Station. #PROTECTIONandSECURITY#Humanity@PMOIndia@HMOIndia@MoHUA_India#15yearsofCISFinDMRCpic.twitter.com/7i9TeZ36Wk