गणपती मंडळाची दान पेटी चोरणाऱ्याला नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:15 PM2018-09-21T20:15:10+5:302018-09-21T20:15:38+5:30
अँटॉप हिल पोलिसांनी अल्ताफ अलीम शेख उर्फ मुस्तफा (वय १९) याला अटक केली असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई - गणेशोत्सवामुळे मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील एका १९ वर्षीय चोरट्याने गणपती मंडळाची दान पेटी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांमुळे चोरट्याचा प्रयत्न फसला आहे. अँटॉप हिल पोलिसांनी अल्ताफ अलीम शेख उर्फ मुस्तफा (वय १९) याला अटक केली असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास सायन कोळीवाडा येथील पंजाब कॅम्पमधील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ गणेशोत्सव साजरा करतं. या मंडळाच्या गणपती मंडपातील दान पेटी मुस्तफा हा घेऊन जाताना काही स्थानिकांनी पाहिले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.