मोसंबी उत्पादकांची ३४ लाखात फसवणूक; मालेगाव इथं एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 18:43 IST2022-03-28T18:43:50+5:302022-03-28T18:43:56+5:30
शिंदी येथील शेतकरी माधव छगन जाधव (४८) यांच्याकडून मोबीन शेख याने २ ऑक्टोंबर २०२१ ते तीन जानेवारी २०२२ या कालावधीत मोसंबी खरेदी केली

मोसंबी उत्पादकांची ३४ लाखात फसवणूक; मालेगाव इथं एकाला अटक
चाळीसगाव जि. जळगाव : शेतक-यांकडील मोसंबी खरेदी करुन त्यांचे पैसे न देता ३४ लाखात फसवणूक करणाऱ्या मालेगावच्या एकास सोमवारी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शिंदी ता. चाळीसगाव येथे हा प्रकार घडला.
मोबीन शेख उस्मान (रा. कुसुंबा रोड, मालेगाव) असे या अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिंदी येथील शेतकरी माधव छगन जाधव (४८) यांच्याकडून मोबीन शेख याने २ ऑक्टोंबर २०२१ ते तीन जानेवारी २०२२ या कालावधीत मोसंबी खरेदी केली. त्यांच्यासोबतच आणखी १३ शेतक-यांकडूनही त्याने गावातील आतिष सुभाष फाटे (३०) याच्या मध्यस्थीने ३३ लाख ८६ हजार रुपयांची मोसंबी खरेदी केली होती. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेवटी शेतकरी माधव जाधव यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.