शेतात मूर्ती सापल्याचा दावा, चमत्कार पाहण्यासाठी लोकांची गर्दी, अखेर , समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:56 AM2022-09-02T07:56:39+5:302022-09-02T07:56:57+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येखील महमूदपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने जमिनीतून पिवळ्या धातूची मूर्ती सापडल्याचा दावा केला.
लखनौ - उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येखील महमूदपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने जमिनीतून पिवळ्या धातूची मूर्ती सापडल्याचा दावा केला. या प्रकरणी पोलिसंनी तीन जणांवर काायदेशीर कारवाई केली आहे. दरम्यान, लोकांकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींनी अॅमेझॉनवरून मूर्ती मागवून हे नाटक रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अप्पर पोलीस आयुक्त शशी शेखर सिंह यांनी सांगितले की, गावात राहणारे अशोक कुमार आणि त्यांचे दोन्ही मुलगे गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला स्वप्नात देवाची मूर्ती सापडल्याचा दावा करत होते. दरम्यान, त्यांच्या शेतात खोदकाम केले असता तिथे धातूच्या मूर्ती सापडल्याचा दावा केला. त्यानंतर या बापलेकांनी तिथे मंदिर बांधण्याची पुडू सोडली.
दरम्यान, या तिघांनीही ऑनलाईन मूर्ती मागवल्या. त्यानंतर त्या शेतात पुरून ठेवल्या. त्यानंतर हे लोकांमध्ये मूर्ती प्रकट झाल्याची बातमी पसरवू लागले. त्यामाध्यमातून या मंडळींनी हजारो रुपयांची दक्षिणाही मिळवली. या तिघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढीत कारवाईसाठी पावले उचलली आहेत.