खरी कॉर्नर परिसरात फुटबॉल समर्थकांमध्ये हाणामारी, ३४ जणांवर गुन्हे दाखल

By सचिन भोसले | Published: April 16, 2023 01:00 PM2023-04-16T13:00:05+5:302023-04-16T13:01:04+5:30

दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये वादावादी

Clash between football supporters in Khari Corner area in Kolhapur as 34 people booked | खरी कॉर्नर परिसरात फुटबॉल समर्थकांमध्ये हाणामारी, ३४ जणांवर गुन्हे दाखल

खरी कॉर्नर परिसरात फुटबॉल समर्थकांमध्ये हाणामारी, ३४ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अंतिम सामन्या नंतर शिवाजी पेठ व मंगळवार पेठेतील समर्थक खरी कॉर्नर येथे एकमेकांना भिडले. पोलिसांनी विना परवाना मिरवणूक काढणे व मारामारी करणे या प्रकरणी दोन्ही बाजूच्या एकूण ३४ जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतंर्गत शनिवारी अंतिम सामना झाला. हा सामना जिंकल्यानंतर खरी कॉर्नर येथे विजेत्या संघाचे समर्थक चषकासह रॅली काढली. दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये वादावादी, एकमेकांवर धावून जाणे, आता लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे असा प्रकार सुरु झाला. याप्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लाठीच्या बळावर पांगवले.

विना परवाना सिस्टीम व मिरवणूक काढल्याबद्दल संपत आनंदराव जाधव, त्रिवेंद्र श्रीराम नलावडे (रा मंगळवार पेठ), शरद गणपतराव पवार रा., मंगेशकर नगर, बेलबाग),  ऋषीकेश गणेश मेथे पाटील,( साठमारी गल्ली, मंगळवार पेठ), प्रथमेश विजय हेरेकर( रा भैरवनाथ कॉलनी, पाचगाव), अक्षय रविद्र पायमल रा.मंगळवार पेठ),  यश नामदेव देवणे (रा तस्ते गल्ली),  सैफ रमजान हकीम, , प्रतीककुमार बदामे, मंगळवार पेठ, अक्षय गणेश मेथे पाटील ,( सर्व मंगळवार पेठ)  शाहीद राजू म्हालकरी (रा. , सुभाषनगर), रोहित राजेंद्र पोवार (रा मंगळवार पेठ), रोहित प्रकाश देसाई (रा. शांतीनगर, भोगम कॉलनी, पाचगाव), ओंकार सुरेश पाटील( रा,पाचगाव), ओमकार शिवाजी मोरे (रा.  मंगळवार पेठ) ,ओमकार संभाजी जाधव( रा मंगळवार पेठ),  कैलास महादेव पाटील (रा मंगळवार पेठ),, ऋषभ राजेंद्र ढेरे (रा,  मंगळवार पेठ),,शोएब इम्तियाज बागवान, (तेली गल्ली, शुक्रवार पेठ), प्रेम प्रकाश देसाई, , (पाचगाव रोड,), अजिंक्य राजेंद्र नलावडे( रा.तस्ते गल्ली), ध्वनीक्षेपक मालक सागर गवळी रा. मंगळवार पेठ, बावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर मारामारी केल्याप्रकरणी शिवाजी तरुण मंडळाचे रोहित उर्दू बॉबी मोरे, अभिषेक इंगवले, राहुल जांभळे, निखिल कोरणे, सुयश हांडे आणि पाटाकडील तालीम मंडळाचे अनिकेत घोटणे, दीपक थोरात, सुमित जाधव, विशाल जाधव, रोहित देसाई, सचिन पाटील, राजू पाटील यांच्यासह अज्ञात दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Clash between football supporters in Khari Corner area in Kolhapur as 34 people booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.