पालिका अधिकाऱ्यांसोबत केली धक्काबुक्की, अवैध बांधकामावर कारवाई करताना घडला प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:31 PM2020-03-02T17:31:28+5:302020-03-02T17:35:36+5:30

हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा

The clash with the municipal authorities, when they were taken against the illegal construction pda | पालिका अधिकाऱ्यांसोबत केली धक्काबुक्की, अवैध बांधकामावर कारवाई करताना घडला प्रकार 

पालिका अधिकाऱ्यांसोबत केली धक्काबुक्की, अवैध बांधकामावर कारवाई करताना घडला प्रकार 

Next
ठळक मुद्देअखेर शिंपी यांच्यासह पथकाने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. महापालिका आयुक्तांनी शिंपी यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

उल्हासनगर - शहर पूर्व येथील एका नाल्या किनाऱ्यावरील सुरू असलेल्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई साठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अतिक्रमण पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार झाला. याप्रकरणी सतपाल यांच्यासह अन्य जनावर कारवाई करण्याची प्रक्रिया हिललाईन पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती शिंपी यांनी पत्रकारांना दिली आहे.


उल्हासनगर कॅम्प नं-5 बैरेक नं 1719 येथील कपालेश्वर महादेव मंदिराच्या मागील नाल्याच्या किनारी 3 हजारा पेक्षा मोठे अवैध बांधकाम सुरु असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाल्यावर त्यांनी शुक्रवारी काम बंद केले होते. मात्र सुट्टीच्या दोन दिवसात बांधकाम उभे केले. गणेश शिंपी यांनी अतिक्रमण पथकासह बांधकाम ठिकाणी जाऊन बांधकामावर पाडकाम  कारवाई सोमवारी दुपारी 3 वाजता सुरु केली. बांधकाम तोडक कारवाई सुरू होताच सतपाल यांच्यासह अन्य जणांनी विरोध करून पथकासह सहाय्यक आयुक्त शिंपी यांना धक्काबुक्की केली. याप्रकाराने बांधकाम घटनास्थळी वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर शिंपी यांच्यासह पथकाने हिललाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हिललाईन पोलिसांनी सुरू केली.


शहर अवैध बांधकामाबाबत कुप्रसिद्धी असून खुले भूखंड, शासकीय जाग्यावर सर्रासपणे अवैध बांधकामे केले जाते. यामध्ये स्थानिक राजकीय हस्तक्षेप होत असल्याने बांधकामावर कारवाई होत नसल्याचे टीका सर्वस्तरातून होत असून महापालिका अधिकाऱ्यांना मुंग गिळून गप्प बसावे लागत असल्याची परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. याप्रकारामुळेच राज्य शासनाचे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पालिकेत येऊ इच्छित नाही. शहरात सर्वत्र आरसीसी बांधकामे होत असून त्यावर कारवाई का केली जात नाही?. आशा प्रश्न निर्माण झाला. गेल्या सहा महिन्यांपासून अवैध बांधकामावरील कारवाई पालिका आयुक्तांनी म्यान केल्याची टीका शहरातून होत आहे.



सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी टार्गेटवर
शहरातील रस्ते मोकळे करणे, हातगाड्यावर कारवाई, रस्ता अतिक्रमणा कारवाई, अवैध बांधकामावर कारवाई आदी सर्व ठिकाणी पथकासह सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे शिंपी भूमाफिया, राजकीय नेते, तथाकित समाजसेवक व पत्रकार यांच्या टार्गेटवर आल्याची चर्चा शहरात रंगली. महापालिका आयुक्तांनी शिंपी यांना पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

Web Title: The clash with the municipal authorities, when they were taken against the illegal construction pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.