भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी; दहा जणांवर गुन्हे दाखल 

By प्रशांत माने | Published: April 12, 2023 07:00 PM2023-04-12T19:00:51+5:302023-04-12T19:01:13+5:30

याप्रकरणी संतोषच्या तक्रारीवरुन जोगेंद्र, राजेंद्र आणि इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय.

Clashes among vegetable vendors; Crimes have been registered against ten people | भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी; दहा जणांवर गुन्हे दाखल 

भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारी; दहा जणांवर गुन्हे दाखल 

googlenewsNext

डोंबिवलीः एकिकडे फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असताना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जून्या भांडणातून भाजी विक्रेत्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारींवरुन दोन्ही गटातील एकूण दहा जणांविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील चिमणी गल्ली, भाजी मार्केट बाटा शोरुमच्या खाली हा हाणामारीचा प्रकार घडला. भाजीपाला विक्रेते संतोष घोलप हे धंदा बंद करीत असताना जोगेंद्र यादव, राजेंद्र यादव व त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी संतोष यांचे चुलत बंधू नरेश घोलप यास मागील भांडणाच्या रागातून लाथाबुक्यांनी मारहाण केली. जोगेंद्र याने नरेश याच्या डोक्यात रॉडने हल्ला केला. संतोष त्याला सोडवण्यासाठी गेला असता त्याला राजेंद्र याने बांबू ने मारले व इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संतोषच्या तक्रारीवरुन जोगेंद्र, राजेंद्र आणि इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय. तर जोगेंद्र याने देखील दिलेल्या तक्रारीत संतोष, नरेश आणि गोपी घोलप यांनी देखील मारहाण केल्याचे नमूद केले आहे. भाजीपाला विक्रीचा धंदा बंद करुन जात असताना हा प्रकार घडल्याकडे तक्रारीत लक्ष वेधले आहे.

Web Title: Clashes among vegetable vendors; Crimes have been registered against ten people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.