अंबाझरीतील पबमध्ये राडा; टोळक्याची बाउन्सरसोबत हाणामारी, पिस्तूल काढल्याचीही चर्चा 

By नरेश डोंगरे | Published: November 19, 2023 07:20 AM2023-11-19T07:20:11+5:302023-11-19T07:20:49+5:30

शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर धरमपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती.

clashes in a pub in Ambazari, Nagpur; There is talk of the gang having a fight with the bouncer | अंबाझरीतील पबमध्ये राडा; टोळक्याची बाउन्सरसोबत हाणामारी, पिस्तूल काढल्याचीही चर्चा 

अंबाझरीतील पबमध्ये राडा; टोळक्याची बाउन्सरसोबत हाणामारी, पिस्तूल काढल्याचीही चर्चा 

 नागपूर : धरमपेठ मधील एका बहुचर्चित पब मध्ये एंट्रीच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर गुन्हेगाराच्या एका टोळक्याने जोरदार राडा केला. यावेळी एका आरोपीने पिस्तूलही काढल्याची जोरदार चर्चा आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर धरमपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ मध्ये आजूबाजूला दोन पब आहेत. येथे सॅटर्डे नाईटला मोठी रक्कम घेऊन तरुण-तरुणींना इंट्री दिली जाते. तेथे मद्यपान आणि अन्य प्रोग्राम होतात. उच्चभ्रू तरुण तरुणी येथे येत असल्याने गुन्हेगारांचीही त्यांच्यावर नजर असते.

आज सॅटर्डे नाईटला असाच प्रकार झाला. रात्री 11 ते 11:30 च्या सुमारास एक टोळके रास्ता मध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेथे बाचाबाची शिवीगाळ झाल्यानंतर बाजूच्या पब मध्ये हे टोळके आले. तिथेही एन्ट्री नाकारल्याच्या कारणावरून त्यांच्यासोबत पब संचालक आणि पाहून बाऊन्सरचा जोरदार वाद झाला. त्यानंतर या टोळीतील आरोपींनी आपल्या काही गुंड साथीदारांना बोलवून घेतले. 

जोरदार हाणामारीनंतर त्या ठिकाणी यावेळी पिस्तुल काढण्याचीही चर्चा होती. दरम्यान, या प्रकारामुळे पब मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. तरुणींची आरडा ओरड धावपळ सुरू झाल्यानंतर कोणीतरी माहिती दिल्यावरून अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काहीना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. ही माहिती कळताच दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात साथीदार पोहोचल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी 
या संबंधाने अंबाझरी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तक्रार मिळाल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवू ,अशी माहिती दिली.

Web Title: clashes in a pub in Ambazari, Nagpur; There is talk of the gang having a fight with the bouncer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.