गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! परीक्षेत नापास करण्याची धमकी देत शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:09 AM2021-03-13T10:09:46+5:302021-03-13T10:49:18+5:30
Class 10 student raped by teacher in Unnao : शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
उन्नाव - गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात घडली आहे. गेल्या एका वर्षापासून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. (Class 10 student raped by teacher in Unnao)
उन्नाव जिल्ह्यातील आसीवन पोलीस स्टेशन परिसरातील रामपूरवा गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन एका शाळेत दहावीचा विद्यार्थीनी आहे, तर तिला घरी शिकवण्याऱ्या शिक्षक प्रदीप कुमार याने परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करत होता. दरम्यान, ५ मार्चला विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी या शिक्षकाला आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिले. त्यानंतर विद्यार्थिनीच्या वडिलांनी तिच्याकडे विचारपूस चौकशी केली असता तिने याबद्दल सविस्तर सांगितले.
याप्रकरणी वडील पोलिसांकडे गेले, परंतु कोणतीही तक्रार झाली नाही. त्यानंतर त्यांनी एसपीकडे तक्रार दाखल केली. उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आसीवन पोलिसांनी रात्री उशिरा शिक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून विद्यार्थिनीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.
एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की, तिची मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. तिला शिकवण्यासाठी शिक्षक 2 वर्षांपासून घरी येत होते. मात्र, गेल्या 1 वर्षापासून या शिक्षकाने तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबतची माहिती मुलीने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी शिक्षक प्रदीप कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बांगरमऊ सीओ अंजनी कुमार राय यांनी सांगितले.