माझ्याकडे तुझे आक्षेपार्ह फोटो आहेत; आठवी नापास तरुणानं तब्बल ४०० तरुणींना लिंक पाठवली अन्...
By कुणाल गवाणकर | Published: January 29, 2021 05:23 PM2021-01-29T17:23:48+5:302021-01-29T17:24:57+5:30
२६ वर्षीय तरुणाला पोलिसांकडून अटक; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
लखनऊ: सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक करून तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. विनीत मिश्रा असं आरोपीचं नाव असून तो २६ वर्षांचा आहे. लखनऊ पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं विनीतला अटक केली. विनीत पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्यानं एका तरुणीनं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी विनीतला बेड्या ठोकल्या.
गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरुन केली हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणीचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं. अकाऊंट हॅक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं तिचे आक्षेपार्ह फोटो मिळवले आणि तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. यानंतर पीडित तरुणीनं पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मंगळवारी विनीत मिश्राला ताब्यात घेतलं.
पोलीस निरीक्षक वेश्या अड्डयावर आढळला ग्राहक म्हणून अन् छापेमारीत झाली अटक
पोलिसांनी मिश्राची चौकशी सुरू करताच अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मिश्रा आठवी नापास आहे. सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याची माहिती तो युट्यूबवरून शिकला. मिश्रा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणींना वेब लिंक पाठवायचा. माझ्याकडे तुझे आक्षेपार्ह फोटो आहेत. खात्री करून घ्यायची असल्यास लिंकवर क्लिक कर असा मेसेज मिश्रा तरुणींना करायचा.
धक्कादायक! आधी प्रेमी युगुलाची केली हत्या, नंतर आत्महत्या भासवण्यासाठी दोघांनाही झाडावर लटकवलं....
तरुणींनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्याकडे ई-मेल आणि पासवर्डची मागणी व्हायची. या माध्यमातून मिश्राला तरुणींच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा ऍक्सेस मिळायचा. त्यानंतर मिश्रा मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रं, व्हिडीओ, चॅट्स डाऊनलोड करायचा. या सगळ्या आक्षेपार्ह गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तो मुलींकडून पैसे उकळायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिश्रानं ४०० तरुणींची सोशल मीडिया अकाऊंट्स हॅक करून त्यांचे फोटो, व्हिडीओ आणि चॅट मिळवले. त्यानंतर तो त्यांना धमकी द्यायचा. पैसे द्या अन्यथा तुमचे फोटो, चॅट्स व्हायरल करेन, अशा धमक्या देऊन त्यानं तरुणींकडून पैसे उकळले. मिश्राच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्याचा लॅपटॉप जप्त केला. आता तो फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आला आहे.