45 हजारांची लाच घेताना लिपिकास पकडले; एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:58 PM2022-02-16T17:58:49+5:302022-02-16T17:59:06+5:30

Crime News : धुळे शहरातील जात पडताळणी विभागात अर्जासोबत दिलेले जात प्रमाणपत्र हरवल्यानंतर त्याच्या दुय्यम प्रतीसाठी 45 हजारांची लाच घेताना लिपिकाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

Clerk caught taking bribe of Rs 45,000 in Dhule; ACB action | 45 हजारांची लाच घेताना लिपिकास पकडले; एसीबीची कारवाई

45 हजारांची लाच घेताना लिपिकास पकडले; एसीबीची कारवाई

Next

धुळे : धुळे जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा जात पडताळणी समितीतील कनिष्ठ लिपिकाला धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील जात पडताळणी विभागात अर्जासोबत दिलेले जात प्रमाणपत्र हरवल्यानंतर त्याच्या दुय्यम प्रतीसाठी 45 हजारांची लाच घेताना लिपिकाला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. विजय वाघ असे या लिपिकाचे नाव आहे. विशेष म्हणजे सुमारे 6 वर्षांनंतर या विभागात प्रथमच ही कारवाई झाली.  धुळे शहरातील रहिवासी असलेल्या एकाने सन 2017 मध्ये जात प्रमाणपत्र घेतले आहे. आता जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागात अर्ज दिला होता. 

यासोबतच मूळ जात प्रमाणपत्रदेखील दिले होते, परंतु हे जात प्रमाणपत्र हरवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराने जात प्रमाणपत्रांची दुय्यम प्रत द्यावी अशी मागणी केली. त्याच्या मोबदल्यात कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ यांनी 50 हजारांची मागणी केली. त्यामुळे संबंधित नागरिकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला. त्यानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळील रस्त्यावर तडजोडीअंती 45 हजारांची लाच घेताना विजय वाघ यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. 

Web Title: Clerk caught taking bribe of Rs 45,000 in Dhule; ACB action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.