व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली लिंक क्लिक करणं पडलं महागात; पत्नीची केली सेक्स वर्कर म्हणून बदनामी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:05 PM2020-01-08T14:05:31+5:302020-01-08T14:07:52+5:30

ऑनलाईन मसाज करण्यासाठी चौकशी करणं पतीसह पत्नीला देखील पडलं महागात  

Clicking on a link on the whats app has costly; Defamation of wife as sex worker | व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली लिंक क्लिक करणं पडलं महागात; पत्नीची केली सेक्स वर्कर म्हणून बदनामी 

व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली लिंक क्लिक करणं पडलं महागात; पत्नीची केली सेक्स वर्कर म्हणून बदनामी 

googlenewsNext
ठळक मुद्दे३० वर्षीय ज्वेलरी डिझायनर असलेल्या या तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  पैसे देण्यास नकार दिल्याने या लिंकमध्ये चक्क त्या तरुणाच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून टाकलेला होता. 

मुंबई  - ऑनलाईन मसाज करण्यासाठी चौकशी करणं ३० वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडल्याची पडलं आहे. मसाजसाठी कॉल गर्लची चौकशी केल्यानंतर समोरच्या महिलेने ५० हजारांची मागणी केली. एवढंच नाही तर पैसे देण्यास तरुणाने नकार देताच समोरच्या व्यक्तीने तरुणाच्या पत्नीचा फोटो एडिट करून सेक्स वर्कर म्हणून एका डेटिंग अ‍ॅपवर अपलोड केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याबाबत ३० वर्षीय ज्वेलरी डिझायनर असलेल्या या तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

पालघरमध्ये हा तरुण राहतो तर नोकरीसाठी अंधेरी येथे जातो. या तरुणाने १४ डिसेंबरला बॉडी मसाज चौकशीसाठी एका व्यक्तीला फोन केला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने पीडित तरुणाला ५ महिलांचे फोटो पाठविले आणि त्यातील एक निवडण्यास सांगितले. त्यावर एक महिलेला निवडून पीडित तरुणाने पालघरला पाठविण्यास सांगितले. त्यासाठी समोरून ५० हजारांची मागणी केली. इतके पैसे देणं शक्य नसल्याने त्या तरुणाने नकार दिला. मात्र पैशासाठी त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी समोरच्या व्यक्तीने थेट तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवर जात त्याच्या पत्नीचा फोट घेतला. हा फोटो एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ करून एका डेटिंग अ‍ॅपवर प्रसिद्ध केला. तसेच पीडित तरुणाच्या पत्नीचा सेक्स वर्कर असा उल्लेखही केला.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित तरुणाला १६ डिसेंबरला व्हॉट्सअ‍ॅपवर एका डेटिंग अ‍ॅपची लिंक मिळाली. त्या लिंकद्वारेच सेक्स वर्करच्या रॅकेटमध्ये पीडित तरुण अडकला. नंतर, पैसे देण्यास नकार दिल्याने या लिंकमध्ये चक्क त्या तरुणाच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून टाकलेला होता. 


आरोपीला पकडण्यासाठी आता पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस आता तरुणाला आलेल्यामोबाईल नंबर ट्रॅक करत आहेत, ज्यावरून आरोपीने पीडित तरुणाला डेटिंग अ‍ॅपची लिंक पाठवली होती. हा आरोपी ऑनलाइन सेक्स चॅट आणि सेक्स वर्कर सर्च करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Clicking on a link on the whats app has costly; Defamation of wife as sex worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.