सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:15 PM2018-12-24T12:15:05+5:302018-12-24T12:15:29+5:30

साक्री : खेळाडू, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

Cm Start of the trophy sports tournament | सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : शहरातील पांझराकान कॉलनीच्या प्रांगणात सी.एम. चषक क्रीडा स्पर्धेच्या दुसºया टप्प्यास प्रारंभ झाला. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातून दोन हजार खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला. हे जागरूक तालुक्याचे वैशिष्ट असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश रामराव पाटील यांनी उदघाटनप्रसंगी केले. 
तालुक्यातील २ हजार २०० खेळाडूंनी विविध खेळांच्या स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणी केली. स्पर्धेच्या दुसºया टप्प्यास प्रारंभ झाला असून उदघाटनप्रसंगी जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, भाजयुमो तालुकाध्यक्ष डॉ.देवेंद्र देवरे, सरचिटणीस राजेंद्र खैरनार, विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.एल. तोरवणे, उभंडचे सरपंच संजय पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, साक्री तालुका विधायक समितीचे अध्यक्ष सुजन सोनवणे, मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे तालुका संयोजक जितेंद्र देसले, पं.स. सदस्य प्रा.युवराज काकुस्ते, गोरख बोराळे, स्वच्छ भारत अभियानाचे जिल्हा संयोजक योगेश भामरे, राकेश अहिरराव, प्रशांत शिरसाठ, बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश संयोजिका डॉ.विजया अहिरराव, डॉ.मिनाक्षी शिंदे, राकेश दहिते आदी उपस्थित होते. 
दुसºया टप्प्यात क्रिकेट, कुस्ती  स्पर्धांसह रांगोळी, गायन, चित्रकला आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेसाठी ४५ संघांनी तर कुस्ती स्पर्धेसाठी १८ मल्लांनी सहभाग नोंदविला. सी.गो. पाटील महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर बेटी बचाव-बेटी पढाव  शीर्षकांतर्गत ३० विद्यार्थिनींनी रांगोळ्या साकारल्या. त्यांचे परीक्षण डॉ.रहाटकर, डॉ.शिंदे, गुलशन देसले, प्रा.उषा शेलार यांनी केले. चित्रकला व गीतगायन स्पर्धांसाठी सी.गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. अहिरे, प्रा.युवराज काकुस्ते, डॉ.देवेंद्र देवरे, जितेंद्र देसले, नंदलाल अहिरे  आदींनी नियोजन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. 
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना जिल्हा व थेट राज्यस्तरावर कौशल्याचा ठसा उमटविता येईल. अंतिम स्पर्धेनंतर प्रत्येक खेळ प्रकारातील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते बक्षिस प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धांसाठी भाजयुमो तालुकाध्यक्ष डॉ.देवेंद्र देवरे, सी.एम. चषक संयोजक सुमित पाटील, अमोल सोनवणे, तेजस जयस्वाल आदी परिश्रम घेत आहेत. 

Web Title: Cm Start of the trophy sports tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे