“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:12 AM2021-08-14T11:12:02+5:302021-08-14T11:13:02+5:30

गेल्या काही कालावधीपासून राज्यात ईडी, सीबीआय यांच्या कारवाईला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

cm uddhav thackeray pa and shiv sena secretary milind narvekar received threatening whatsapp message | “मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी

“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही कालावधीपासून राज्यात ईडी, सीबीआय यांच्या कारवाईला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यामागे केंद्रातील मोदी सरकारचा हात असल्याचा दावा सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, भाजपकडून सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज पाठवला असून, यामध्ये मागण्या पूर्ण केल्या नाहीतर ED आणि CBI लावू, असा इशारा देण्यात आला आहे. (cm uddhav thackeray personal assistant and sena secretary milind narvekar received threatening whatsapp message)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे. 

भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही

या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे नेमक्या कोणत्या मागण्या केल्या याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, या अज्ञात व्यक्तीने केलेल्या मागण्या नार्वेकर यांनी पूर्ण न केल्यास मिलिंद नार्वेकर यांच्यामागे चौकशी लावण्याची धमकी देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ४.५ वर्षांत तब्बल ८४७२ एन्काऊंटर; ३ हजार जण जखमी, १४६ ठार

दरम्यान, आताच्या घडीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील काही नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये सीबीआयदेखील चौकशी करत आहे. अनिल देशमुख यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवूनही ते चौकशीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहायला नकार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली आहे. 
 

Read in English

Web Title: cm uddhav thackeray pa and shiv sena secretary milind narvekar received threatening whatsapp message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.