'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 23:05 IST2020-01-09T22:29:19+5:302020-01-09T23:05:08+5:30
पालकांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.

'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी
मुंबई - पीडित मुलीच्या वडिलांना धमकावल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा चालक दिनकर साळवे याला निलंबित करण्यात आले आहे. नवी मुंबईत राहणारे डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. दोन दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी उत्तर प्रदेशात सापडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वाहन चालक असलेल्या दिनकर साळवे याच्याकडून पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. पालकांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
बेपत्ता तरुणी पोचली उत्तर प्रदेशात; पोलिसांचे तिला सुखरूप आणण्याचे प्रयत्न
पनवेल कोर्टात परवा दुपारी निशिकांत मोरे यांच्या अटकपूर्वजामिनाची सुनावणी असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात ' शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू' अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुबीयांनी धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कॉन्स्टेबल असलेले दिनकर साळवे गेल्या 15 दिवसापासून उध्दव ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. दिनकर साळवे आणि निशिकांत मोरे यांची मागील 15 वर्षांपासून ओळख आहे.
गृह विभागाचा मोठा निर्णय; विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजीचे निलंबन