"४ दिवस शिल्लक आहेत, जे करायचेय ते करा", CM योगी आदित्यनाथांना जिवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:34 AM2021-05-04T08:34:58+5:302021-05-04T08:38:57+5:30

UP CM Yogi Adityanath gets death threat : पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे.

UP CM Yogi Adityanath gets death threat; 'you have four days', warns WhasApp message on UP police helpline | "४ दिवस शिल्लक आहेत, जे करायचेय ते करा", CM योगी आदित्यनाथांना जिवे मारण्याची धमकी 

"४ दिवस शिल्लक आहेत, जे करायचेय ते करा", CM योगी आदित्यनाथांना जिवे मारण्याची धमकी 

Next
ठळक मुद्देयोगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही धमकी आली होती. गेल्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) आपत्कालीन सेवा डायल ११२ च्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना हा  धमकीचा मेसेज (Threat Call) पहिल्यांदाच आला नाही, तर याआधीही आला आहे. त्यामुळे पोलीस विशेष सतर्क आहेत. दरम्यान, या मेसेजसंदर्भात पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे आणि नंबरची चौकशी करून आरोपीचा शोध घेत आहेत. (UP CM Yogi Adityanath gets death threat; 'you have four days', warns WhasApp message on UP police helpline)

मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा डायल ११२ व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने मेसेज करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "मुख्यमंत्र्यांजवळ ४ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे या ४ दिवसांत माझे काय करायचे आहे, ते करा. ५ व्या दिवशी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींना ठार करेन", असे या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचा तपास सुरू
धमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. घाईघाईत धमकी देण्यात येणाऱ्या क्रमांकाची तपासणी करण्यासाठी सर्व्हिलान्स टीम तैनात केली आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये कंट्रोल रूम डायल ११२ चे ऑपरेशन कमांडर अंजुल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे, जे सर्व्हिलान्स सेलच्या मदतीने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्र्यांना यापूर्वीही धमकी 
योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही धमकी आली होती. गेल्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातून एकाला अटक केली होती.

Read in English

Web Title: UP CM Yogi Adityanath gets death threat; 'you have four days', warns WhasApp message on UP police helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.