धक्कादायक! तरूणाच्या प्रायवेट पार्टमध्ये सहकाऱ्याने लावलं प्रेशर पंप, हवा भरल्याने वेदनादायी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:42 AM2022-12-14T10:42:24+5:302022-12-14T10:43:58+5:30

Crime News : हालत खराब झाल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं समजतं. पुढील चौकशी सुरू आहे.

Co worker filled air in private part of a boy by pressure pump in Dhule had painful death | धक्कादायक! तरूणाच्या प्रायवेट पार्टमध्ये सहकाऱ्याने लावलं प्रेशर पंप, हवा भरल्याने वेदनादायी मृत्यू

धक्कादायक! तरूणाच्या प्रायवेट पार्टमध्ये सहकाऱ्याने लावलं प्रेशर पंप, हवा भरल्याने वेदनादायी मृत्यू

googlenewsNext

Crime News : धुळे (Dhule) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्यासोबत काम करत असलेल्या व्यक्तीसोबत गमती गमतीत असं काही केलं की, त्याचा जीव गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना निजामपूर भागातील आहे. इथे एका कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने सहकाऱ्याच्या प्राइवेट पार्टमध्ये आधी प्रेशर पंप लावलं. नंतर हवा भरण्याचा प्रयत्न केला. याने त्याच्या आतील अवयवांचं फार नुकसान झालं. हालत खराब झाल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं समजतं. पुढील चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव तुषार होतं. तो निजामपूरच्या एका प्रायव्हेट कंपनीत ठेकेदार म्हणून काम करत होता. या कंपनीत  शरीर आणि कपड्यांवरून मेटलची धूळ काढण्यासाठी प्रेशर पंपचा वापर केला जातो. असं सांगण्यात आलं की, सोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने गंमतीने तुषारवर प्रेशर पंपचा वापर केला होता. 

आतील अवयवांचं नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, काम संपवल्यावर सगळेच घरी जाण्याची तयारी करत होते. यादरम्यान एका सहकाऱ्याने तुषारच्या प्रायवेट पार्टमध्ये प्रेशर पंप लावला. नंतर नोजलने हवा भरण्याचा प्रयत्न करू लागला होता. अशातच हवेच्या जास्त प्रेशरमुळे त्याच्या आतील अवयवांना फार इजा झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

हवेच्या प्रेशरमुळे तुषारच्या आतील अवयवांचं फार नुकसान झालं. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कसंतरी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण त्याची स्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केलं. नंतर उपचारासाठी त्याला गुजरातला नेण्यात आलं. पण आत जास्त इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषारच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Co worker filled air in private part of a boy by pressure pump in Dhule had painful death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.