आचारसंहितेचा भंग! १ कोटी रुपये असलेली बॅग बसमधून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:38 PM2019-04-06T18:38:39+5:302019-04-06T18:41:05+5:30
ऐन निवडणुकांच्या तोंडावर अशी पैशाने भरलेली बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली – आगामी लोकसभेची देशभरात रणधुमाळी सुरु झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील राजम येथे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन बसमधून तब्बल जवळपास १ कोटी रुपये असलेली बॅग जप्त करण्यात आली आहे.
ऐन निवडणुकांच्या तोंडावर अशी पैशाने भरलेली बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील श्रीककुलम पोलिसांना ही जवळपास १ कोटी रुपये असलेली पैशांची बॅग हस्तगत केली आहे. राजममधील जेंदाला दिबा येथे ही बॅग सापडली आहे. एवढी मोठी रक्कम असलेली ही बॅग नक्की कोणाची आहे. याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही. याबाबत तेथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Andhra Pradesh: Srikakulam police seized Rs 1 Crore (approximately) cash, stuffed in bags, from an Andhra Pradesh State Road Transport Corporation bus at Jendala Dibba in Rajam today. pic.twitter.com/2BFm9hO7ir
— ANI (@ANI) April 5, 2019