१९ वर्षीय तरूणीने अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 01:17 PM2021-08-31T13:17:46+5:302021-08-31T13:18:18+5:30
पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने डिंडीगुलमध्येच आपल्यापेक्षा दोन वर्षाने लहान मुलांसोबत लग्न केलं आणि पुन्हा परत कोयंबटूर आली.
तामिळनाडूच्या कोयंबटूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका १९ वर्षीय तरूणीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत तिने लग्न केलं. या लग्नानंतर ती अडचणीत सापडली आहे. कारण तिच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर तिला विशेष कोर्टात हजर करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडीत पााठवण्यात आलं.
पेट्रोल पंपावर झालं प्रेम
न्यूज एजन्सी आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने १०व्या वर्गात नापास झाल्यावर आपलं शिक्षण सोडलं होतं आणि कोयंबटूरच्या पोलाचीमध्ये पेट्रोल पंपावर नोकरी करू लागली होती. तेच १२वीचं शिक्षण पूर्ण केल्यावर मुलगाही त्याचा पेट्रोल पंपावर काम करत होता. यादरम्यान तरूणी या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर ती त्याच्यासोबत डिंडीगुलला गेली.
मुलाच्या आईने दिली तक्रार
पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने डिंडीगुलमध्येच आपल्यापेक्षा दोन वर्षाने लहान मुलांसोबत लग्न केलं आणि पुन्हा परत कोयंबटूर आली. तिथे दोघेही भाड्याने एका घरात राहत होते. मुलाच्या आईने तरूणीविरोधात मुलाच्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. तेच महिलेने तक्रार केल्याचं समजताच तरूणीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. (हे पण वाचा : Crime News: प्रेमप्रकरण बेतले जीवावर, महिलेसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या )
पोलिसांनी सांगितलं की, १९ वर्षीय एक तरूणीला एका अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. १७ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याचाही गुन्हा तिच्यावर नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.