कॉलेज तरुणींनी दाखवला हिसका; भररस्त्यात रोड रोमियोला चोप देऊन केले पोलिसांच्या हवाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:58 PM2018-07-20T19:58:54+5:302018-07-20T20:02:27+5:30

माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली

College girls shot up; road Romeo was bitten and handed over to the police | कॉलेज तरुणींनी दाखवला हिसका; भररस्त्यात रोड रोमियोला चोप देऊन केले पोलिसांच्या हवाली 

कॉलेज तरुणींनी दाखवला हिसका; भररस्त्यात रोड रोमियोला चोप देऊन केले पोलिसांच्या हवाली 

googlenewsNext

मुंबई - रस्त्यावरील तरुणींची छेड काढणाऱ्या ऱोड रोमिओला महाविद्यालयीन तरुणींनी चांगलीच अद्दल घडवली आहे. छेड काढणाऱ्या तरुणाला चोप देऊन या तरुणींनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. अंकुश महाडिक असे या रोड रोमिओचे नाव असून त्याच्या विरोधात माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. 

माटुंग्यांच्या एसएनडीटी महाविद्यालयाची एक तरुणी बुधवारी माटुंगा रेल्वे स्थानकाहून काॅलेजच्या दिशेने जात होती. त्यावेळी स्थानक परिसरापासून अंकुश तिचा पाठलाग करू लागला. माटुंगा जिमखाना येथील पेट्रोलपंपजवळ पीडित तरुणी आली असताना अंकुशने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अंकुशने तिचा हात पकडत, तिच्याशी जबरदस्तीने  बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पीडित मुलगी अंकुशचे काहिही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने तिने कशीबशी स्वत: ची सुटका केली. आपल्यासोबत घडलेला प्रकार तिने काॅलेजचे शिक्षकांना सांगितला. त्यावेळी इतर विद्यार्थींनी ही अंकुशबाबत तक्रार केली. त्यावेळी कॅालेजचे शिक्षक आणि विद्यार्थीनी अंकुशचा शोध घेण्यासाठी माटुंगा परिसरात फिरत असताना. एका चहाच्या टपरीवर चहाचे घोट घेत मोठ मोठ्या गप्पा हाणत बसलेल्या अंकुशला त्यांनी चोप देत पकडले.  तरुणींची छेड काढल्याबाबत जाब विचारू लागले. त्यावेळी अंकुश उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. नंतर विद्यार्थींनी त्याला चोप देत पोलिसांना पाचरण केले. विद्यार्थिनींनी दिलेल्या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अंकुश याला अटक करण्यात आली.

Web Title: College girls shot up; road Romeo was bitten and handed over to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.