विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 03:36 PM2021-04-18T15:36:29+5:302021-04-18T15:37:42+5:30

Mumbai police commissioner Hemant Nagrale : आज दहिसर चेक नाक्यासह अनेक चेक पॉंईंटसवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेटी देऊन आजपासून कलर कोडची कडक अंमलबजावणी कारण्यास पोलिसांना आदेश दिले आहेत. 

Colorcode will be strictly enforced by Mumbai Police from today | विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार

विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार

Next
ठळक मुद्देमेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे. कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शनिवारी एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर काही वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. 'कलम १४४ नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे. कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले. तसेच आज दहिसर चेक नाक्यासह अनेक चेक पॉंईंटसवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेटी देऊन आजपासून कलर कोडची कडक अंमलबजावणी कारण्यास पोलिसांना आदेश दिले आहेत. 


कलर कोड पद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहराचे प्रमुख एंट्री पॉइंट तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. या नाकाबंदीत स्टिकरशिवाय असणाऱ्या गाड्या अडवून तपासणी केली जाणार आहे. कलर कोड नसेल मात्र वाहन अत्यावश्यक सेवेसाठी चालवले जात असेल तर कागदपत्र तसेच इतर शहानिशा करून त्या वाहनाला कोड दिला जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र, जे लोकं या कलर कोडमध्ये मोडत असतील आणि त्यांनी हे कलरचे स्टिकर पोलीस देतील याची वाट न पाहता ते स्वतःही कार्डपेपर किंवा गोटी पेपरचा वापर करून स्टिकर लावू शकतात. मात्र, स्टिकर लावलेल्या वाहनाला पोलिसांना अडवून त्याबाबतचे ओळखपत्र दाखवणे अत्यावश्यक असेल, असे नगराळे पुढे म्हणाले.

विनाकारण फिरणाऱ्यांना वेसण घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहने स्वतःहून सहा इंच आकाराचा योग्य त्या रंगाचा गोल स्टिकर लावून शकतात अन्यथा स्थानिक पोलीस ठाणे किंवा नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांमार्फत मोफत कोडचे स्टिकर दिले जाणार आहेत.

लाल रंग - डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वर्ग, ऍम्ब्युलन्स, लस केंद्र, खासगी लॅब, औषध उत्पादन कंपन्या, केमिस्ट, आरोग्य विमा कंपन्या, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित इतर उत्पादन, वितरण करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी

हिरवा रंग - खाद्यपदार्थ म्हणजेच किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी उत्पादने, बेकरी उत्पादने, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारा साहित्याची वाहतूक करणारी वाहने

पिवळा रंग - केंद्र, राज्य सरकारी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रसारमाध्यमे, पाणीपुरवठा, विद्युत आणि गॅस पुरवठा करणारी वाहने, सरकारी आणि खासगी सुरक्षा एजन्सी, बँक तसेच एटीएममध्ये रोकड पोहचविणारी वाहने, पोस्ट आणि पेट्रोलियम कंपन्यांची वाहने

Web Title: Colorcode will be strictly enforced by Mumbai Police from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.