इंटेरिअरच्या कामासाठी इमारतीचे खांब फोडले; रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 22:34 IST2019-06-22T22:32:18+5:302019-06-22T22:34:09+5:30
माहिम पोलिसांनी तळमजल्यावरील घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इंटेरिअरच्या कामासाठी इमारतीचे खांब फोडले; रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना
मुंबई : माहिम पश्चिमेच्या एल जे रोडवरील कॅसा लुना इमारतीमध्ये इंटेरिअरच्या कामासाठी घरमालकाने मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली असून इमारतीच्या पिलर्सनाही धोका पोहोचवला आहे. यामुळे इमारतीमधील रहिवासांना तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
माहिम पोलिसांनी तळमजल्यावरील घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवानगी न घेता इमारतीला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने तोडफोड करण्यात आली आहे. तळमजल्यावरील फ्लॅटच्या इंटेरिअरचे काम या घरमालकाने सुरू केले होते. यावेळी इमारतीच्या खांबांना तोडण्यात आले आहे. यामुळे इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
घरमालक अब्दुल रेहमान शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अशाप्रकारे बेकायदेशीरपणे तोडफोड करणाऱ्या कंत्राटदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.