बलात्काराने खारघरमध्ये माजली खळबळ; पार्किंग केलेल्या बसमध्ये तरुणीची दोघांनी लुटली अब्रू
By पूनम अपराज | Published: February 9, 2021 08:58 PM2021-02-09T20:58:59+5:302021-02-09T21:01:04+5:30
Rape in Kharghar : खारघर येथे पार्क केलेल्या बसमध्ये १९ वर्षीययुवतीवर दोन जणांनी बलात्कार केला, त्यातील एक तिचा मित्र होता.
खारघर येथे पार्क असलेल्या बसमध्ये दोन पुरुषांनी १९ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकालाअटक केली आहे. खारघर येथे पार्क केलेल्या बसमध्ये १९ वर्षीययुवतीवर दोन जणांनी बलात्कार केला, त्यातील एक तिचा मित्र होता.
पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे. अटक आरोपी आणि फरार आरोपी खारघरमधील एकाच इमारतीत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, २२ वर्षांचा आरोपी ड्रायव्हर म्हणून काम करतो तर १९ वर्षीय आरोपी पिझ्झा डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो.
तिच्या तक्रारीत पीडित तरुणीने सांगितले की, ३ फेब्रुवारी रोजी २२ वर्षीय मुख्य आरोपी याने तिला आपल्यासोबत दुचाकीवरून येण्यास सांगितले आणि त्याने तिला भेटवस्तू खरेदी करण्याचे वचन दिले. तिने पुढे सांगितले की, आरोपींनी दारूच्या दुकानातून दारू विकत घेतली आणि नंतर तिला खारघरच्या उत्कर्ष हॉलजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास पार्क केलेल्या बसमध्ये नेले.
इच्छा नसूनही आरोपींनी तिला मद्यपान करण्यास भाग पाडले असा दावा या १९ वर्षीय मुलाने केला आहे. पीडित तरुणी असुरक्षित अवस्थेत होती, तेव्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर त्याने घटनास्थळी बोलावून १९ वर्षाच्या आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दोन्ही आरोपी पीडितेला बसवर सोडून घटनास्थळावरुन निघून गेले.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने घरी जाण्यासाठी एक ऑटो केली आणि दुसर्याच दिवशी तिच्या कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी खारघर पोलिसांकडे संपर्क साधला आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच या 19 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली. परंतु २२ वर्षांचा आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.