कंपनी सीईओ महिलेने केली पाेटच्या चिमुकल्याची हत्या; कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 06:13 AM2024-01-10T06:13:37+5:302024-01-10T06:14:07+5:30

घटस्फोटित पती मुलाला भेटू नये म्हणून झाली सैतान

Company CEO Woman Kills his own son as his divorced husband wanted to meet him | कंपनी सीईओ महिलेने केली पाेटच्या चिमुकल्याची हत्या; कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

कंपनी सीईओ महिलेने केली पाेटच्या चिमुकल्याची हत्या; कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: घटस्फोटित पतीला अद्दल घडविण्यासाठी ईर्षेने पेटलेल्या एआय कंपनीच्या महिला सीईओने आपल्याच ४ वर्षांच्या बाळाचा खून केल्याची घटना गोव्यात घडली. सूचना सेठ असे निर्दयी मातेचे नाव असून बाळाचा मृतदेह बॅगमध्ये भरून बंगळुरूला जात असताना पोलिसांनी तिला अटक केली.

सूचनाचे पती विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. दोघांतील संबंध बिघडल्याने घटस्फोटापर्यंत प्रकरण वाढले. न्यायालयाने मुलाचा ताबा आईकडे देण्यासह वडिलांना आठवड्यातून एकदा मुलाची भेट घेण्याची मुभा दिली होती.

पतीने मुलाला भेटू नये म्हणून सूचना ६ जानेवारीला मुलाला घेऊन बंगळुरूहून विमानाने गोव्याला आली. पुढील तीन दिवस ती विविध ठिकाणी फिरली. ८ जानेवारीला मुलाचा खून केला आणि बाळाचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने बंगळुरूला निघाली. मात्र वाटेत असताना कॅबचालकाच्या मदतीने तिला अटक करण्यात आली.

कॅबच्या आग्रहाने संशय बळावला

गोव्याहून बंगळुरूला परत जाण्यासाठी ८ जानेवारीला रात्री तिने रिसेप्शनला कॅब बुक करायला सांगितले. विमानापेक्षा कॅबभाडे महागडे असल्याने रिसेप्शनला ते खटकले.  मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हॉटेलमधून चेकआउट करताना तिच्या सोबत मुलगा दिसला नाही. सकाळी खोलीची स्वच्छ करताना रक्ताचे डाग दिसल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.

...म्हणे मुलगा नातेवाइकांकडे थांबला
nपोलिसांनी बंगळुरूच्या दिशेने निघालेल्या कॅब चालकाला फोन करून सूचना यांच्याशी बोलणे करण्यास सांगितले. 
nत्यानुसार पोलिसांनी सूचना यांना मुलाबाबत विचारले असता, तो नातेवाइकांकडे थांबल्याचे सांगितले. संशय येऊ नये म्हणून नातेवाइकांचा पत्ताही दिला.परंतु तो खोटा निघाला. 
nअखेर पोलिसांनी पुन्हा कॅबचालकाला नजीकच्या पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि पुढे आयमंगल पोलिसांच्या मदतीने तिला अटक केली.

 

Web Title: Company CEO Woman Kills his own son as his divorced husband wanted to meet him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.