तक्रारदार मुलगाच निघाला मारेकरी;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:35 AM2019-06-07T04:35:53+5:302019-06-07T04:35:58+5:30

आरेतील घटना; अनैतिक प्रेमसंबंधाच्या रागातून वडिलांची हत्या

The complainant son leaves the killer; | तक्रारदार मुलगाच निघाला मारेकरी;

तक्रारदार मुलगाच निघाला मारेकरी;

Next

मुंबई : वडिलांचे अन्य एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजताच मुलाने मित्रांच्या मदतीने त्यांची हत्या केल्याची घटना आरेमध्ये घडली. त्यानंतर स्वत:च तक्रारदार बनून तो पोलिसांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अजय रामायण पांडे (१९) असे मुलाचे नाव असून, त्याच्यासह मित्र विनय अमरबहादूर सिंग (३९), सुरेशकुमार उर्फ पिंटू रामसमीर यादव (२२) यांनाही पोलिसांनी अटक केली. तर अन्य रिक्षाचालक मित्र पसार आहे.

आरे कॉलनी येथील केंद्रीय कुक्कुटपालन संघटन केंद्राच्या भिंतीजवळ एक व्यक्ती जखमी पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. आरे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. मृतदेहाजवळून पोलिसांना मोबाइल क्रमांक मिळाला. मात्र, मोबाइलमध्ये बॅलन्स नसल्याने कॉल लागत नव्हता. पोलिसांनी त्या मोबाइलवरून पोलीस नियंत्रण कक्षात कॉल करून माहिती घेतली. तेव्हा, मृत व्यक्तीचे नाव रामायण पांडे असल्याची माहिती मिळाली. रामायण यांनी ज्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला होता, त्या सर्वांना पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा, त्यांचा मुलगा अजय तेथे आला. त्याने, मृत व्यक्ती आपले वडील असल्याचे सांगून मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्याच तक्रारीवरून आरे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांच्या तपास पथकाने तपास हाती घेतला. त्या वेळी अजयच्या जबाबात तफावत दिसून आली. त्याच्या मोबाइलचे लोकेशनही हत्या झालेल्या परिसरातील असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याची उलटतपासणी करताच हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

Web Title: The complainant son leaves the killer;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.