अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:43 PM2020-08-04T20:43:30+5:302020-08-04T20:43:56+5:30
एका तक्रारीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे आज मंगळवारी पोलिसांकडे करण्यात आली.
नागपूर : पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे निषेध नोंदविण्यात आला. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी एका तक्रारीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे आज मंगळवारी पोलिसांकडे करण्यात आली.
प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनिश पांडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला. पत्रकार गोस्वामी यांनी या माध्यमातून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
गोस्वामी यांचे हे वक्तव्य आणि कृती निषेधार्ह असून ते समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ होत असून सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पत्रकार अर्णाब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा. त्यांच्या चैनलवरही बंदी घालावी, अशी मागणी रवनीश पांडे यांनी तक्रारीतून केली आहे. फॅन्स क्लबचे सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मंगळवारी दुपारी कळमना पोलिस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी ही तक्रार नोंदविली. या तक्रारीसोबत पांडे यांनी व्हिडीओ क्लिपही पोलिसांना दिली. ठाणेदार चव्हाण यांनी ही तक्रार नोंदवून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवली आहे. तक्रारीची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी विचारविमर्श करीत आहेत.
विशेष शाखेकडून दखल
पत्रकार गोस्वामी यांच्याविरुद्ध यापूर्वीही नागपुरात एक तक्रार दाखल झाली होती. आजची ही दुसरी तक्रार असून तिचे गांभीर्य लक्षात घेत विशेष शाखेतर्फेही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चौकशी सुरू : डीसीपी नीलोत्पल
या तक्रारीची आणि व्हिडीओ क्लिपची आम्ही चौकशी करीत आहोत. मुंबईत असा काही गुन्हा दाखल झाला का, त्याचीही चौकशी केली जात आहे, असे या संबंधाने बोलताना परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा
थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या
"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस
आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात
मुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली