गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात बारामतीत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:37 AM2020-09-28T06:37:44+5:302020-09-28T06:38:13+5:30
शनिवारी अख्तर हे मुलाखतीत रिया चक्रवर्ती प्रकरणासंदर्भात बोलताना म्हणाले, चरस, गांजा, भांग यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही.
बारामती : आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी मराठी वृत्त वाहिनीवर केले. त्याविरोधात बारामती येथील अॅड. भार्गव पाटसकर यांनी नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी) कडे जावेद अख्तर यांच्यावर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
शनिवारी अख्तर हे मुलाखतीत रिया चक्रवर्ती प्रकरणासंदर्भात बोलताना म्हणाले, चरस, गांजा, भांग यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही. मात्र, आपल्याकडे एनडीपीएस कलम २७ नुसार गांजा, चरस सेवन करणे अपराध आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. पाटसकर यांनी केली आहे.