महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 08:49 PM2019-06-05T20:49:51+5:302019-06-05T20:53:21+5:30
ड न कापल्याने राहुल याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात उघड केल्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील राहणारा राहुल अशोक सावंत (28) या तरुणाच्या डोक्यावर धोकादायक झाड पडून 11 मार्चला मृत्यू झाल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाचे तत्कालीन अधिकारी सुरेंद्र पाटील यांच्यावर निष्कळजीपणाचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनामध्ये खळबळ माजली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या राहुल अशोक सावंत (28) हा वसंत नगरी सेक्टर नंबर 1 मधील श्रीविना सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून 25 फेब्रुवारी 2019 ला रात्री साडे आठच्या सुमारास सदरच्या सोसायटीमधील धोकादायक झाड त्याच्या डोक्यात पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती केले होते. पण उपचारादरम्यान 11 मार्चला त्याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास करत होते. पोलिसांनी तपासादरम्यान वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाचे तत्कालीन अधिकारी सुरेंद्र पाटील यांनी त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने धोकादायक असलेले झाड न कापल्याने राहुल याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात उघड केल्यावर गुन्हा दाखल केला आहे.