OYOच्या संस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:03 PM2019-11-06T18:03:24+5:302019-11-06T18:04:18+5:30

35 लाख रुपये भाडं ‘ओयो’ने थकविल्याचा आरोप

A Complaint is filed against the founder of OYO | OYOच्या संस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  

OYOच्या संस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  

Next
ठळक मुद्दे OYO च्या रोहित श्रीवास्तव, माधवेंद्र कुमार, गौराब डे, प्रतीक अग्रवाल, मंजीत सिंह आणि मृणाल चक्रवर्ती यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.काउंटर तक्रार बंगळुरूतील हॉटेल मालकाविरोधात करणार असल्याचं OYOने पत्रकात म्हटलं आहे.

बंगळुरू - OYO हॉटेल्स अँड होम्स’चे संस्थापक रितेश अग्रवाल आणि सहा जणांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हॉटेलच्या रूमचे 35 लाख रुपये भाडं थकविल्याचा ‘ओयो’विरोधात आरोप करत हॉटेल मालकांनी ही तक्रार केली आहे. रितेश अग्रवाल यांच्यासह पोलिसांनी OYO च्या रोहित श्रीवास्तव, माधवेंद्र कुमार, गौराब डे, प्रतीक अग्रवाल, मंजीत सिंह आणि मृणाल चक्रवर्ती यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

बेंगळुरू येथील डोमलर परिसरातील ‘हॉटेल रॉक्सेल इन’चे मालक आणि तक्रारदार बेट्स फर्नांडीस यांनी OYO हॉटेल्सच्या संस्थापकाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. ‘ओयो’ने हॉटेलमधील रुम बुक केल्या आणि त्यासाठी दर महिन्याला 7 लाख रुपये भाडं ठरलं होतं. मात्र, मे महिन्यापासून अद्यापपैसे मिळालेला नाही, असं बेट्स यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. रितेश अग्रवाल आणि अन्य सहा जणांना गुरूवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लक्ष वेधण्यासाठी अयोग्य कायदेशीर मार्गांचा वापर केल्याप्रकरणी  काउंटर तक्रार बंगळुरूतील हॉटेल मालकाविरोधात करणार असल्याचं OYOने पत्रकात म्हटलं आहे.

Web Title: A Complaint is filed against the founder of OYO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.