५ फूट खड्ड्यात पडून जखमी झालेल्या महिलेची तक्रार, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 05:03 PM2020-09-03T17:03:28+5:302020-09-03T17:05:26+5:30
लोकमान्य नगर रस्ता खचला प्रकरण
ठाणे : लोकमान्यनगर येथील खचलेल्या रस्त्यामुळे चेंबरमध्ये पडून जखमी झालेल्या प्रीती सिंग (26) यांनी आता याप्रकरणी बुधवारी रात्री केलेल्या तक्रारीवरून ठेकेदाराविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून माहिती घेऊन ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे या संदर्भात मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन संबंधीत ठेकेदाराविरोधात पुढील सात दिवसात कारवाई करावी, तसेच संबधीत अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
ठाण्यात ५ फूट खड्यात पडून महिला जखमी
बुधवारी पहाटे 5.45 च्या सुमारास लोकमान्यनगर येथील बस आगारातून यशोधननगरच्या दिशेने जाणारा रस्ता खचल्याची घटना घडली होती. याच दरम्यान पहाटे प्रीती या मार्गावरून चालत जात असताना त्या पडून जखमी झाल्या. ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत प्रीतीने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गुरुवारी याच प्रकरणावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, ठाणे शहर उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे आदींसह इतरांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई तत्काळ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुढील सात दिवसांच्या आत संबधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, जखमी महिलेचीही या शिष्ट मंडळाने भेट घेतली असून तिच्यावर सध्या सरकारी कोवीड रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत असल्याने या महिलेला स्वत:वर सरकारी रुग्णालयात उपचार घेणो असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चाने या महिलेला खाजगी रुग्णालयात उपचार करुन द्यावेत अशी मागणही त्यांनी केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा
सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर