The Kashmir Files: अलर्ट! ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता; चुकूनही ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:32 AM2022-03-17T08:32:15+5:302022-03-17T08:32:37+5:30

काश्मीर फाइल्सच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

Complaints of fraud cyber criminals through The Kashmir Files movie at delhi | The Kashmir Files: अलर्ट! ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता; चुकूनही ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

The Kashmir Files: अलर्ट! ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्याची उत्सुकता; चुकूनही ‘या’ लिंकवर क्लिक करू नका

Next

नवी दिल्ली – सध्या देशात एका सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे ती म्हणजे ‘द काश्मीर फाइल्स’. काश्मीरातील पंडितांवर झालेल्या अत्याचाराबाबत कथा या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. भाजपा शासित राज्यात द काश्मीर फाइल्स हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर काँग्रेसनं या सिनेमावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’वर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाष्य केले आहे.

त्यातच आता द काश्मीर फाइल्स(The Kashmir Files) चित्रपटाचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी लोकांना लुटण्याचा नवी युक्ती लढवली आहे. लोकांमध्ये चर्चेत असलेल्या या सिनेमाची लिंक बनवून ती मोबाईलवर पाठवण्यात येत आहे. यूपीच्या गौतमबुद्ध नगर येथील ही घटना आहे. काही ऑनलाइन सायबर महाभागांनी द काश्मीर फाइल्स सिनेमा पाहण्यासाठी ही लिंक क्लिक(The Kashmir Files Online Cheating) करा असं आमीष लोकांना दाखवत त्यांची फसवणूक करत आहेत. कुणीही व्यक्ती संबंधित लिंक वर क्लिक करत असेल तर त्याच्या बँक खात्यातून रक्कम लंपास केली जात आहे.   

यावर नोएडा झोनचे डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, काश्मीर फाइल्सच्या नावाखाली अनेकांना फसवल्याची तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस याचा रात्रंदिवस तपास करत आहे. प्रत्येक तक्रारीत एक गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे लिंक वर क्लिक केल्यानंतर संबंधितांचा मोबाईल हॅक होतो. त्यानंर थोड्यावेळात त्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढल्याचा मेसेज येतो. या प्रकारावरून दिल्ली आणि नोएडा येथील स्थानिक पोलीस सतर्क झाले आहेत.

पोलिसांचा लोकांना अलर्ट

नोएडा पोलिसांच्या मते, सर्वसामान्य सायबर महाभागांच्या या फसवणुकीपासून अज्ञान आहेत. कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. जर सिनेमा पाहण्याच्या आमिषापोटी तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यास काही क्षणात तुमच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते. द काश्मीर फाइल्स सिनेमा पाहण्याची उत्सुकता असणाऱ्या लोकांना सायबर गुन्हेगारांना शिकार बनवलं आहे. विशेष म्हणजे द काश्मीर फाइल्स सिनेमा आल्यापासून लोकांमध्ये त्याची मोठी चर्चा आहे. या सिनेमावरून दोन मतप्रवाह आहेत. एकजण या सिनेमाच्या समर्थनासाठी पुढे येत असून दुसरा गट धर्माच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचा आरोप करत आहे.  

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) काँग्रेसला नाव न घेता लगावला.

Web Title: Complaints of fraud cyber criminals through The Kashmir Files movie at delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.