संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:27 PM2020-08-29T18:27:51+5:302020-08-29T18:29:03+5:30
Sushant Singh Rajput Case : संदीप सिंहच्या अडचणीत होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींची बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह आणि भाजपा यांच्यातील संबंधांची चौकशी करण्यासाठी मला बर्याच विनंत्या व तक्रारी आल्या आहेत, त्यानंतर मी बॉलिवूड आणि ड्रग्जशी त्याच्या संबंधाबद्दल तपासासाठी सीबीआयकडे त्या तक्रारी पाठवणार असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे संदीप सिंहच्या अडचणीत होण्याची शक्यता आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवे वळण येत असतानाच या प्रकरणावरुन राजकारणही तापले आहे. अशातच आता या प्रकरणामध्ये ड्रग्जबाबतीत माहितीनंतर एनसीबीने रियासह अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप काही व्हॉ्सअपवरील चॅटवरून समोर आले आहे. ड्रग्जच्या विषयावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील ड्रग्जच्या नेक्ससची चौकशी करावी अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र पाठलं आहे. त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. याच फोटोवर रिप्लाय करताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.
राम कदम यांचं ट्विट रिट्विट करत सचिन सावंत यांनी थेट भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संदीप हा बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले,” असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संदीप सिंह, फडणवीस, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय एकाच स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे.
I have received many requests & complaints to investigate the relationship between Sandeep Singh, who made PM Modi's biopic & BJP; regarding his connection with Bollywood & drugs. I will send these requests to CBI for investigation: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/DcQvLZypqV
— ANI (@ANI) August 29, 2020
.@OfficeofUT , @AnilDeshmukhNCP request you to see @BJP4India angle in following request. CBI to qn Mr. Sandeep Singh in drug nexus in #SushantSinghRajputDeathCase . He is a producer of a biopic 'PM Narendra Modi' whose poster was launched by Fadnavis ji.https://t.co/ZmqaXwWCGPhttps://t.co/Ne1lFxZKEupic.twitter.com/7TyO3u2Trn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 28, 2020