ऑफिसमध्ये महिलेच्या फिगरची स्तुती करणे लैंगिक शोषणच; न्यायालयाने बॉसला जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 09:33 AM2023-06-04T09:33:12+5:302023-06-04T09:33:39+5:30

मुंबईतील एका रिअल इस्टेट कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर आणि सेल्स मॅनेजरवर त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत.

Complimenting a woman's figure in the workplace is sexual harassment; The court denied bail to the boss | ऑफिसमध्ये महिलेच्या फिगरची स्तुती करणे लैंगिक शोषणच; न्यायालयाने बॉसला जामीन फेटाळला

ऑफिसमध्ये महिलेच्या फिगरची स्तुती करणे लैंगिक शोषणच; न्यायालयाने बॉसला जामीन फेटाळला

googlenewsNext

आर्थिक राजधानी मुंबईतील एका सत्र न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दोन आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याला तिची फिगर चांगली आहे आणि डेटवर येतेस का असे या आरोपींनी विचारले होते. यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

मुंबईतील एका रिअल इस्टेट कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर आणि सेल्स मॅनेजरवर त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. याची तक्रार या महिलेने कार्यालयातदेखील केली आहे. यामुळे या दोघांनी अटकपूर्व जामीन मागण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. 

लैंगिक छळाचा हा गुन्हा महिलेने 24 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात नोंदवला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध लैंगिक छळ आणि महिलेचा विनयभंग करणे, महिलेचा पाठलाग करणे, अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सरकारी वकिलांनी 1 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती न्यायालयासमोर ठेवली होती. ज्यामध्ये महिलांच्या लैंगिक छळाचा उल्लेख होता. 

मॅडम, तुम्ही स्वत:ला खूप चांगले मेन्टेन ठेवले आहे. तुझी फिगर खूप छान आहे. माझ्याबरोबर बाहेर जाण्याचा विचार केला आहे की नाही? असे आरोपी तिला म्हणत असे. यावर आरोपींनी आपण असे काही कृत्य केलेच नसल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्याला खोट्या प्रकरणात गोवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर सरकारी वकिलांनी आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावर न्यायालयाने असे म्हटले की, सेल्स मॅनेजरचे वडील आणि कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण गंभीर असून त्यात महिलेच्या प्रतिष्ठेचा समावेश आहे. या प्रकरणात आरोपीने लैंगिक छळासोबतच महिलेच्या प्रतिष्ठेलाही धक्का लावला आहे. कामाच्या ठिकाणी घाणेरडी आणि अश्लील भाषा वापरली. हे असे प्रकरण नाही ज्यात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला जावा असे न्यायाधीश एआर खान यांनी म्हटले. त्येक केसचे वेगवेगळे पैलू असतात. काही प्रकरणांमध्ये, कोठडीत चौकशी आवश्यक असते आणि काही प्रकरणांमध्ये नसते, असे खान म्हणाले. 

Web Title: Complimenting a woman's figure in the workplace is sexual harassment; The court denied bail to the boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.