ससूनच्या नवीन इमारतीतून नेटवर्कींगचे पाच लाखांचे साहित्य चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 05:06 PM2018-07-27T17:06:45+5:302018-07-27T17:08:18+5:30

ससूनच्या नव्या इमारतीचे काम सुरु असून, या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर ठेवलेल्या खाेलीतील संगणकविषयक साहित्य चाेरट्यांनी लांबवले.

computer equipments worth rs 5 lakh stolen from sasson new building | ससूनच्या नवीन इमारतीतून नेटवर्कींगचे पाच लाखांचे साहित्य चोरीला

ससूनच्या नवीन इमारतीतून नेटवर्कींगचे पाच लाखांचे साहित्य चोरीला

Next

 पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ठेकेदाराने ठेवलेले ४ लाख ८३ हजार रुपयांचे संगणकविषयक साहित्य चोरट्यांनींनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.  


          याबाबत ठेकेदार मनोजकुमार गडकर (वय ४८, रा. मालाड, मुंबई) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयाच्या आवारात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर एका खोलीत गडकर यांनी संगणकविषयक साहित्य (नेटवर्किंग) ठेवले होते. चोरट्यांनी खोलीतून ४ लाख ८२ हजार २०७ रुपयांचे साहित्य चोरून नेले. गडकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ससून रुग्णालयाच्या परिसरात नेहमी मोठी गर्दी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी सुरक्षारक्षक देखील नेमण्यात आले आहेत. मात्र तरीही नवीन इमारतीमधून साहित्य चोरीला गेल्याने येथे सुरेक्षाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. जमदाडे पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: computer equipments worth rs 5 lakh stolen from sasson new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.