सिनेस्टाइल पाठलाग करून दारूसाठा जप्त; पडोली पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:16 PM2021-06-05T17:16:02+5:302021-06-05T17:17:41+5:30
Seized of Liquor : साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : पडोली पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ३५ बॉक्स देशी दारूसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी पडोली चौकात करण्यात आली.
चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक एम.एम. कासार यांच्या मार्गदर्शनात पडोली चौकात नाकाबंदी केली. दरम्यान, एमएच ३१ सीआर २०३२ क्रमाकांच्या कारने पोलिसांना बघून माॅर्डन पेट्रोल पंपाजवळून वळण घेऊन पळ काढला; परंतु पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागे येत असल्याचे बघून वाहनचालकाने वाहन सोडून पळ काढला.
भाऊबंदकीतून कोल्हापूरजवळ एकाचा खून, सख्या भावानेच केले वारhttps://t.co/YHO1LLPavU
— Lokmat (@MiLOKMAT) June 5, 2021
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात ३५ पेट्या देशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारू व वाहन असा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. एम. कासार यांच्या नेतृत्वात चंदू ताजणे, स्वप्नील बुरीले, संदीप वासेकर, लक्ष्मण रामटेके, सुमित बरडे, किशोर वाकाटे आदींनी केली.