फेरीवाल्याने बनावट घड्याळ महाग दिल्यावरून राडा; २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 09:42 PM2021-12-22T21:42:55+5:302021-12-22T21:43:41+5:30
Crime News : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर शांतीसागर हॉटेल समोर मोहम्मद हरशद सलीम गालप हा फेरीवाला घड्याळ विक्रीचा व्यवसाय बाकडा लावून करतो.
मीरारोड - फेरीवाल्याने कंपनीचे बनावट घड्याळ महाग दिले या कारणा वरून फेरीवाल्याच्चे साथीदार आणि खरेदीदारचे साथीदार यांच्यात मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर तुंबळ राडा झाल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी दोन्ही बाजूने एकमेकां विरुद्ध फिर्याद घेऊन २० ते २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर शांतीसागर हॉटेल समोर मोहम्मद हरशद सलीम गालप हा फेरीवाला घड्याळ विक्रीचा व्यवसाय बाकडा लावून करतो. रविवारी रात्री हरशद, त्याचा भाऊ सैफ आलम व राजा आलम आणि मित्र अब्दुल वाहीद उल्डे असे चौघे घड्याळ विक्रीच्या बाकड्या जवळ होते. अब्दुलच्या फिर्यादीनुसार, आसीफ खान, साजेद अली खान, सऊद शेख इतर ७ ते ८ जणांनी मिळून हरशद, सैफ, राजा व अब्दुल यांना धक्का बुक्की करुन खाली पाडुन लाथा ,बुक्याने बेदम मारहाण केली. पोलिसांनी आसीफ खान , साजेद अली खान, सऊद शेख इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
आसिफ खान याने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी राजा आलम, सैफ आलम, हरशद गालप , अब्दुल उल्डे सह त्यांच्या अन्य ६ ते ७ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . समीर खान याला त्याच्या वसई येथील मित्राने फेरीवाला हरशद कडून घडयाळ विकत घेवुन गिफ्ट दिले होते. ते घडयाळ समीर याने आसिफला दाखवले . घड्याळ पाहून ते डुप्लिकेट असून महाग दिले असल्याचे आसिफ म्हणाला .
घड्याळ बदलण्यासाठी फेरीवाल्या कडे गेले. हरशद ला सदर घड्याळ डुप्लिकेट असल्याने पैसे परत कर असे सांगतले असता त्याने नकार दिला . त्यावरून शिवीगाळ होऊन त्याचे पर्यवसान राड्यात झाले . राजा , सैफ , हरशद , अब्दुल व इत्तर ६ ते ७ जणांनी मिळून आसिफ खान , समीरखान, झेन शेख व आसिफ शहा याना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .