अभिनंदन! १६ 'मपोसे' बनले आयपीएस अधिकारी, केंद्रीय गृह विभागाची अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 08:59 PM2020-09-30T20:59:47+5:302020-09-30T21:00:24+5:30
दीड वर्षापासून होते प्रलंबित, लोकमत पाठपुरावा
मुंबई - गेल्या सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्य पोलीस सेवेतील 16 वरिष्ठ अधिकाऱ्याचा भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) समाविष्ट होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय गृह विभागाने त्याच्या निवडीबाबत बुधवारी अधिसूचना जारी केली. गृह विभागाकडून त्याच्या प्रस्ताव पाठविण्याबाबत होत असलेल्या सुस्ताईबद्दल 'लोकमत 'ने आवाज उठवित पाठपुरावा केला होता. सहा अधिकाऱ्यांची 2017 तर दहा अधिकाऱ्यांची 2018 च्या निवड यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
त्याची नावे अशी ( २०१७निवड यादी )
सदानंद वायसे -पाटील, अविनाश बारगळ, एन टी ठाकूर, शिरीष सरदेशपांडे, नितिन पवार, व दिगंबर प्रधान
* २०१८- निवड यादी - शीला डी साईल, पी. आर पाटील, तुषार दोशी, बी बी पाटील ( वाघमोडे ), सदानंद बुरसे सुनिता साळुंखे – ठाकरे, श्रीकांत परोपकारी, सोमनाथ घारगे , रवींद्रसिंह परदेशी व पुरुषोत्तम कराड
एका अधिकाऱ्यांला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न
आयपीएस मानांकन मिळालेल्या पी. आर. पाटील यांना दीड वर्षापूर्वी नागपूर एसीबीमध्ये कार्यरत असताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडून एका खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाले होते. मात्र पहिल्यांदा 'मॅट' कोर्टाचे आदेश व नंतर विशेष पोलीस तपासातून त्याच्यावरील खोटा गुन्हा काढुन टाकण्यात आला.त्यामुळे सेवा जेष्ठतेच्या आधारावर आयपीएस बनण्याचा मार्ग मोकळा झाला.