कारवायांचा कट उधळला, पाच दहशतवादी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 06:40 AM2023-07-31T06:40:20+5:302023-07-31T06:40:54+5:30

हे पाच जण स्वातंत्र्य दिनापूर्वी काही नेते, पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्याच्या तयारीत होते.

Conspiracy foiled, five terrorists arrested | कारवायांचा कट उधळला, पाच दहशतवादी गजाआड

कारवायांचा कट उधळला, पाच दहशतवादी गजाआड

googlenewsNext

बलवंत तक्षक -
 
चंडीगड : पाच दहशतवाद्यांना अटक करून पंजाबपोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा कट उधळून लावला. हे पाच जण स्वातंत्र्य दिनापूर्वी काही नेते, पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी सांगितले की, ज्यांची हत्या करायची त्यांच्या नावांची यादी आरोपींना दिली होती. त्यांनी त्यातील काहींची रेकीही केली होती. 

हे पाच जण खलिस्तान लिबरेशन फोर्स या फुटीरवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. गगनदीप सिंग, आशिष, सागर मसीह, राजीव मसीह आणि समनदीपसिंग चीमा अशी आरोपींची नावे असून, ते गुरदासपूर येथील रहिवासी आहेत.

Web Title: Conspiracy foiled, five terrorists arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.