यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट?, गुप्तचर विभागाने दिला अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 08:36 PM2022-05-25T20:36:12+5:302022-05-25T20:38:46+5:30
Chances of a major terrorist attack against Yassin Malik's sentence : देशाची राजधानी आणि एनसीआर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.
नवी दिल्ली : फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठा अलर्ट जारी केला आहे. देशाच्या गुप्तचर विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त, सुमारे 6 ते 7 संवेदनशील अलर्ट दिल्ली पोलिसांना प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, दिल्लीच्या तिहार जेल नं. ७ च्या वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या शिक्षेच्या निषेधार्थ दिल्ली एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात.
देशाची राजधानी आणि एनसीआर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अलर्टनुसार, ज्या दिवशी यासिन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवले होते. त्याच दिवसापासून दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे की, यासिन मलिकला दोषी ठरवल्याच्या निषेधार्थ, त्याचे कट्टर समर्थक आणि त्याच्या जवळच्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांनी सीमेपलीकडून दिल्ली NCR मध्ये दहशतवादी हल्ल्या घडवण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे दिल्ली NCR मध्ये दहशतवाद विरोधी उपाययोजना कराव्यात. विशेषत: ज्या दुचाकी नंबर प्लेट किंवा संशयास्पद नंबरप्लेटशिवाय जोडलेले दिसतात त्या दुचाकीवर लक्ष ठेवावे. या अलर्टनंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल सज्ज झाला आहे.
फाशीपासून वाचला, NIA कोर्टाने यासिन मलिकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
हे आहेत इतर आरोपी
फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल शाह. रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेते.
आरोपपत्रात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संस्थापक हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांचीही नावे आहेत. या प्रकरणात ज्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. यासिन मलिकच्या शिक्षेबाबत त्याची पत्नी मुशालने पाकिस्तानमध्ये पत्रकार परिषद घेतली होती.