जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी गुंडांशी ‘संग’ हवालदार ‘निलंबित’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 10:53 AM2021-01-15T10:53:17+5:302021-01-15T11:31:36+5:30

Crime News: बाणेर येथील बहुचर्चित जमिनीचे प्रकरण

Constable 'suspended' with goons for possession of land in Pune | जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी गुंडांशी ‘संग’ हवालदार ‘निलंबित’

जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी गुंडांशी ‘संग’ हवालदार ‘निलंबित’

Next

पुणे : बाणेर येथील जमिनीसाठी गुंडांशी संग करण्याचा प्रयत्न एका नामांकित पोलीस हवालदाराला चांगलाच अंगाशी आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात असताना बाणेरमधील जमिनीचे डिल करणार्‍या पोलीस हवालदार सुनिल सुदाम पवार याला पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबित केले आहे. 


हवालदार सुनिल पवार हे सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असतानाही बाणेर येथील जागेबाबत ते पैशांची देवाण घेवाणीबाबत चर्चा करत होते. 
बाणेर येथील स़नं. ३३/२ पैकी १ येथील २३.१० गुंठे जागेवर काही गुंडांनी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण करुन बेकायदेशीरपणे ११ जानेवारी २०२१ रोजी ताब्यात घेतली होती. त्याबाबत अमोल पांडुरंग कळमकर (रा. माधवबाग सोसायटी, बाणेर) यांनी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली. 


बाणेर येथील जमीनवर पोलिसांच्या सहाय्याने काही गुंडांनी जबरदस्तीने अतिक्रमण करुन ताबा घेतला आहे. त्याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात न आल्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच ऋषिकेश बारटक्के यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यांची चौकशी केली असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखविले. त्यात हवालदार सुनिल पवार हे त्या जागेचा ताबा मिळवण्याकरीता पैशांची देवाण घेवाणीची चर्चा करत असल्याचे दिसत आहे. तसा ऋषिकेश बारटक्के यांचा सविस्तर जबाब घेण्यात आला आहे. याबाबत झालेली चौकशीवरुन व सादर केलेल्या ऑडिओ व व्हिडिओ रेकॉडिंगवरुन हवालदार सुनिल पवार यांनी शिस्तप्रिय पोलीस खात्यास कर्तव्यास असून त्यांचे वर्तन हे पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असून त्यांचे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असून पोलीस दलास अशोभनीय आहे. त्यामुळे सुनिल पवार याला निलंबित करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी काढला आहे.


गुंडांशी संग केल्याने पोलीस हवालदाराला निलंबित केले असले तरी अतिक्रमण करुन जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Web Title: Constable 'suspended' with goons for possession of land in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.