बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:49 PM2020-08-28T20:49:28+5:302020-08-28T21:09:18+5:30

डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून तातडीने मेयो किंवा मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. 

Constable who was working in Bomb squad dies due to heart attack | बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू 

बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू 

Next
ठळक मुद्देसांगितले. चव्हाण मेयो चौकात पोहोचले आणि त्यांनी तिथे एका मेडिकल स्टोअर्समधून ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, चक्कर आल्याने ते खाली पडले.

नागपूर - शहर पोलिस दलात बॉम्ब शोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवलदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला. चव्हाण गेल्या चार वर्षांपासून बीडीएसमध्ये सेवारत होते. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नंतर शोल्डर दुखू लागले. त्यामुळे त्यांनी मुख्यालयातील पोलिस इस्पितळात संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून तातडीने मेयो किंवा मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. 

चव्हाण मेयो चौकात पोहोचले आणि त्यांनी तिथे एका मेडिकल स्टोअर्समधून ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना चालकाने मेयो इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 पोलिस दलात खळबळ
 तीन दिवसात पोलीस दलात कर्मचाऱ्यांचा झालेला  आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयातील सुरज पंचभाई नामक पोलीस कर्मचारी आणि गुरुवारी सुरेश पाल नाम कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हे दोघे कोरोनामुळे दगावले. तर चव्हाण यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

 

 

 

Web Title: Constable who was working in Bomb squad dies due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.