पाक समर्थनात घोषणाबाजी प्रकरण : तपासात विलंब केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 15:53 IST2020-06-13T15:43:17+5:302020-06-13T15:53:02+5:30
हुबळीमध्ये तीन काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या संशयावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

पाक समर्थनात घोषणाबाजी प्रकरण : तपासात विलंब केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलंबित
बंगळुरु : कर्नाटकमधील हुबळी ग्रामीण पोलीस स्टेशनमधील निरीक्षक जॅक्सन डिसुझा यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्रलंबित खटल्यांच्या तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जॅक्सन डिसुझा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हुबळीमध्ये तीन काश्मिरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या संशयावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याचा तपास जॅक्सन डिसुझा यांच्याकडे होता.
या तिन्ही काश्मिरी विद्यार्थ्यांना जामीन कोर्टाने तांत्रिक कारणास्तव जामीन मंजूर केला. मात्र, याप्रकरणी काही संघटनांनी पोलीस निरीक्षक जॅक्सन डिसूझावर आरोपपत्र दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एका तपास पोलीस अधिकाऱ्याला 90 दिवसांची मुदत दिली जाते. ती मुदत याप्रकरणात झाली नव्हती, असे उत्तर रेंजमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले.
दरम्यान, गेल्या फेब्रुवारी महिन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कर्नाटकातील हुबळी येथील केएलई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकणारे काश्मीरचे तीन विद्यार्थी आशिक सोफी, तालिब मजीद आणि अमीर वानी यांनी पाकिस्तान समर्थनात घोषणा दिल्या होत्या. यानंतर हुबळी पोलिसांनी तत्काळ या विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आणि त्यांना बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात पाठविले.
आणखी बातम्या...
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख
नवजात बाळाच्या हृदयात 3 ब्लॉक; आदित्य ठाकरेंनी उपचारांसाठी केली 'लाख'मोलाची मदत
CoronaVirus Treatment : HCQ सोबत अॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा...
'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार
स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल”