चार मैत्रिणींना डेट करत होता तरुण, एकाचवेळी घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:27 PM2021-11-12T12:27:23+5:302021-11-12T12:29:39+5:30

West Bengal: कूचबिहारच्या जोरपटकी गावात एका स्थानिक मेडिकल स्टोअरमध्ये हा तरुण काम करत होता.

Cornered by 4 girlfriends, Cooch Behar man attempts suicide West Bengal | चार मैत्रिणींना डेट करत होता तरुण, एकाचवेळी घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न

चार मैत्रिणींना डेट करत होता तरुण, एकाचवेळी घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न

Next

कोलकाता : पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील एका घटनेची सध्या जोरदार चर्चा आहे. दरम्यान, एक तरूण एकाच वेळी चार मैत्रिणींना डेट करत होता. त्याचे आयुष्य मजेत जात होते, पण एके दिवशी चारही मैत्रिणी त्याच्या घरी आल्या. यानंतर या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कूचबिहारच्या जोरपटकी गावात एका स्थानिक मेडिकल स्टोअरमध्ये हा तरुण काम करत होता. मेडिकलमधून काम संपल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याला त्याच्या चारही मैत्रिणी एकत्र दिसल्या. हा तरुण या चारही मैत्रिणींसोबत डेट करत होता. या चौघींनाही याची माहिती मिळताच त्यांनी एकमेकांशी संपर्क साधून या तरुणाचे घर गाठले. यानंतर या चौघांनी त्या तरुणाच्या घराबाहेर एकच गोंधळ घातला. 

तसेच, खूप वादावादी झाली. यामुळे वैतागून तरुणाचे अचानक घरात जाऊन विष प्राशन केले. यानंतर लगेच त्याला शेजारी असलेल्या लोकांनी येथील माथाभंगा रुग्णालयात नेले. मात्र, तरुणाची परिस्थिती पाहात पुढील उपचारासाठी त्याला कूचबिहार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी चार मैत्रिणींनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, त्यामुळे याबाबत पोलीस अद्याप काहीही बोलण्यास टाळत आहेत, तर मुलाचे कुटुंबीयही मीडियाच्या कॅमेऱ्यांना टाळत आहेत. सध्या रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Read in English

Web Title: Cornered by 4 girlfriends, Cooch Behar man attempts suicide West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.