कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली लोकांची फसवणूक, तिघांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:12 PM2022-01-31T18:12:48+5:302022-01-31T18:13:25+5:30

Crime News : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलच्या आयएफएसओ युनिटने ओमायक्रॉन (Omicron) बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे.

corona booster dose 3 people arrested cheated hacking whatsapp | कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली लोकांची फसवणूक, तिघांना अटक!

कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली लोकांची फसवणूक, तिघांना अटक!

Next

नवी दिल्ली :  कोरोना (Corona) महामारीमध्ये कधी ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder), तर कधी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर (Oxygen Concentrator), आता बूस्टर डोसच्या  (Booster Dose) नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलच्या आयएफएसओ युनिटने ओमायक्रॉन (Omicron) बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे.

या तिघांना अटक झाल्यापासून आतापर्यंत 24 गुन्हे उघडकीस आले असून त्यातून त्यांनी बूस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांची 8 बँक खातीही बंद केली आहेत, ज्यामध्ये हे तिघे बुस्टर डोसच्या बहाण्याने पैसे जमा करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 डेबिट कार्ड, 1 चेकबुक आणि 6 मोबाईल जप्त केले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या तिघांची टोळी सरकारी विभागातील कर्मचारी असल्याचे दाखवून बूस्टर डोसच्या नावाने पहिल्यांदा कॉल करत होते. त्यानंतर कॉलच्या वेळी नागरिकांना विश्वासात घेऊन, भेटीसाठी व्हॉट्सअॅप कॉन्फरन्स कॉलमध्ये सामील होण्यास सांगत होते. एखादी व्यक्ती कॉन्फरन्स कॉलमध्ये सामील होताच, त्याचे व्हॉट्सअॅप खाते हॅक केले जात होते. त्यानंतर ही टोळी पीडितेच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये उपस्थित असलेल्या नातेवाईक आणि मित्रांना पैसे मदतीचे मेसेज पाठवत आणि यूपीआयद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा करत होते. 

दिल्लीतील आरके पुरम भागात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान या टोळीचा आतापर्यंत दोन डझनहून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मनीष कुमारने सांगितले की, जवळपास 1 वर्षापूर्वी त्याने यूट्यूबवर व्हॉट्सअॅप कसे हॅक करायचे हे शिकले होते, तेव्हापासून तो सतत लोकांशी अशा प्रकारे चॅट करत होता.

Web Title: corona booster dose 3 people arrested cheated hacking whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.