30-30 रुपयांना विकले 'कोरोनाचे औषध'; आता कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:54 PM2020-07-03T16:54:41+5:302020-07-03T16:57:23+5:30

रामदेव बाबांच्या कोरोनिल प्रकरणानंतर जागे झालेल्या गावकऱ्यांनी या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना या औषधाची माहिती विचारली.हे औषध विकण्यासाठी आरोग्य विभाग किंवा आयुष मंत्रालयाचे आदेश आहेत का, असे विचारताच त्या कर्मचाऱ्यांनी उत्तर देणे नाकारले.

'Corona medicine' sold for Rs 30-30; Action will be taken from Uttar pradsh govt | 30-30 रुपयांना विकले 'कोरोनाचे औषध'; आता कारवाई होणार

30-30 रुपयांना विकले 'कोरोनाचे औषध'; आता कारवाई होणार

Next

गाझीपूर : एकीकडे सारे जग कोरोनावरील लस शोधण्याच्या कामात लागलेली असताना काही लोक या महामारीचा गैरफायदा घेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये खोटे सांगून काही जण 30 ते 50 रुपयांत कोरोनावर उपचार करत आहेत. हे लोक नागरिकांमध्ये अफवा पसरवत असून हे औषध घेतल्यानंतर कोणालाच कोरोना होणार नाही आणि ज्यांना झाला आहे त्यांचा बरा होईल, असे सांगितले जात आहे. आता या प्रकरणाने वेग घेताच गाझीपूर प्रशासन कारवाई करणार असल्याचे सांगत आहे. 


गाझीपूर जिल्ह्यातील बिरनो पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील 'आन शोध संस्थान'ने कोरोनापासून बचाव करण्यासाठीम्हणून लोकांना औषधाची विक्री केली. यावेळी सांगितले की, ही होमिओपथिक आर्सेनिक अल्बम-30 नावाचे औषध असून ते कोरोनाविरोधात जालीम उपाय ठरले आहे. या संस्थेने हे औषध 30 ते 50 रुपयांना विकले. 


रामदेव बाबांच्या कोरोनिल प्रकरणानंतर जागे झालेल्या गावकऱ्यांनी या स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना या औषधाची माहिती विचारली.हे औषध विकण्यासाठी आरोग्य विभाग किंवा आयुष मंत्रालयाचे आदेश आहेत का, असे विचारताच त्या कर्मचाऱ्यांनी उत्तर देणे नाकारले. तोपर्यंत हे कर्मचारी अनेकांना हे औषध विकून मोकळे झाले होते. यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. 


राज्यभरात विक्री सुरु
ग्रामस्थांनी विचारल्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, केवळ गाझीपूरमध्येच नाही तर राज्यभरात संस्थेच्या स्वयंसेवकांकडून हे औषध विकले जात आहे. या एनजीओचे मुख्य कार्याल लखनमध्ये आहे. तेथूनच हे औषध संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पाठविण्यात येत आहे. 


कारवाईचे आदेश
जेव्हा ही बाब जिल्हाधिकारी ओमप्रकाश आर्य यांना समजली तेव्हा त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणाची माहिती घेत असल्याचे सांगितले. जर यामध्ये बेकायदा काही होत असेल तर तत्काळ कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

रामदेव बाबांच्या औषधाला परवानगी
रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधाला परवानगी देण्यात आली असून ते औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे म्हणून विकले जाणार आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचा निर्णय बदलला; बंदी 31 जुलैपर्यंत वाढविली

कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

Web Title: 'Corona medicine' sold for Rs 30-30; Action will be taken from Uttar pradsh govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.